पंजाबचे माजी मुख्यमंत्री, अकाली राजकारणातले दिग्गज धुरंधर प्रकाश सिंग बादल कालवश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाबचे 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले अकाली राजकारणातले दिग्गज धुरंधर नेते प्रकाश सिंग बादल यांचे निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. पंजाबच्या अकाली राजकारणातले ते सर्वात ज्येष्ठ नेते होते. फाळणी पूर्वीचा अखंड पंजाब, फाळणी नंतरचा भारतातला पंजाब ते पंजाब आणि हरियाणा, हिमाचल प्रदेश अशी तीन राज्ये होऊन उरलेला पंजाब या पंजाबी राजकारणातली सर्व स्थित्यंतरे प्रकाश सिंग बादल यांनी सक्रिय राहून अनुभवली होती. Prakash Singh Badal passed away, important leader after master tara singh of akali politics in Punjab

स्वातंत्र्यपूर्व काळापासून मास्टर तारासिंग हे अकाली राजकारणातले सर्वोच्च नेते होते. त्यांच्यानंतर भारतीय संघराज्यावर संपूर्ण विश्वास ठेवून संपूर्ण पंजाब वर आपले राजकीय वर्चस्व निर्माण करणारे प्रकाश सिंग बादल हे दुसरे नेते होते. पंजाब मध्ये त्यांनी एवढे मोठे राजकीय वर्चस्व टिकवून ठेवले होते, की 1971 पासून ते अगदी 2012 पर्यंत ते पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री झाले. अकाली राजकारणाची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हातात ठेवली होती.

मास्टर तारासिंग यांच्या काळात अकाली दल हा अखंड एकात्म पक्ष होता आणि मास्टर तारासिंग यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदू महासभेशी अतिशय जवळचे संबंध होते. प्रकाश सिंग बादल यांनी तेच सूत्र पकडून उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी पक्षांची पंजाब मध्ये नेहमी युती केली. त्यामुळे त्यांचे आणि जनसंघाचे त्यानंतरच्या भाजपचे अतिशय निकटचे संबंध राहिले. मास्टर तारासिंगानंतर अकाली दलाची अनेक शकले झाली. अनेकांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या तरी प्रकाश सिंग बादल यांनी हिंदुत्ववादी पक्षांची नाळ जोडून ठेवली.

दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या जनसंघीय कालखंडापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपच्या कालखंडापर्यंत प्रकाश सिंग बादल आणि हिंदुत्ववादी पक्ष पंजाब मध्ये कायम बरोबर वाटचाल करत राहिले.



मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर मात्र अकाली दल आणि भाजप यांच्यात मतभेदाची दरी रुंदावली आणि त्यांचे राजकारणाचे मार्ग वेगळे झाले. पण तोपर्यंत स्वतः प्रकाश सिंग बादल सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते आणि त्यांनी अकाली दलाची सूत्रे यांचे चिरंजीव सुखबीर सिंग बादल यांच्याकडे सोपवली होती.

प्रकाश सिंग बादल यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा अस्वस्थ कालखंड देखील जवळून अनुभवला होता. अकाली दलाचे राजकारण करूनही प्रकाश सिंग बादल यांनी कधीही फुटीरतावादी भूमिका घेतली नाही. त्या उलट भारतीय संघराज्य व्यवस्थेत सामावून घेणारा स्वायत्त पंजाब याकडे त्यांचा कल राहिला. त्यामुळे काँग्रेस पेक्षा उजव्या विचारसरणीचा जनसंघ आणि नंतर भाजप या दोन पक्षांची त्यांची राजकीय नाळ अधिक जुळली. त्यामुळे ते अन्य कोणाही मुख्यमंत्र्यापेक्षा अधिक काळ सत्तेवर राहू शकले. त्याचबरोबर अन्य कोणत्याही पंजाबी नेत्यापेक्षा पंजाबच्या राजकारणावर प्रकाश सिंग बादल यांची राजकीय छाप अधिक ठळक राहिली होती.

अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रकाश सिंग बादल यांची राजकीय केमिस्ट्री विशेष जुळली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातले केंद्रीय मंत्री होतेच, पण नंतरही मोदी यांच्याशी त्यांची निकटची वैयक्तिक मैत्री होती. अकाली दल आणि भाजप यांची युती तुटली तरी या वैयक्तिक मैत्रीला कधी बाधा आली नाही. प्रकाश सिंग बादल यांच्या निधनामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याचा अमृतकाल एवढा दीर्घ कालावधी राजकारणात काढलेला दिग्गज धुरंधर नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

 

Prakash Singh Badal passed away, important leader after master tara singh of akali politics in Punjab

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात