विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आज त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. सुमारे 8 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान मोदी 2000-2000 रुपये निधी हस्तांतरित करतील. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.Pradhan Mantri Kisan Yojana 15th installment money will be deposited in farmers accounts today
15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 18,000 कोटी रुपयांचा 15 वा हप्ता जारी करतील. याआधी 27 जुलै रोजी मोदींनी राजस्थानमधून पीएम फंडाचा हप्ता जारी केला होता. मात्र, यावेळीही ३ कोटींहून अधिक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. हे तेच शेतकरी आहेत, ज्यांनी सरकारने जारी केलेल्या नियमांचे अद्याप पालन केले नाही.
यासंदर्भात आपलं स्टेटस तपासण्यासाठी प्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा. येथे उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय मिळेल. यानंतर लाभार्थी स्थितीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.
नवीन पेजवर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी कोणताही पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता. यानंतर, तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा क्रमांक भरा. यानंतर Get Data वर क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App