केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चेन्नई विमानतळावर पोहोचताच वीजपुरवठा खंडित, भाजपचा सुरक्षेत हलगर्जीपणाचा आरोप; द्रमुक नेते म्हणाले- CBI चौकशी करा

वृत्तसंस्था

चेन्नई : गृहमंत्री अमित शहा शनिवारी चेन्नईत होते. विमानतळावर उतरताच वीजपुरवठा खंडित झाला. पथदिवे बंद झाले आणि विमानतळाभोवती अंधार झाला. यावर भाजपने तामिळनाडूच्या द्रमुक सरकारवर गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत कुचराई केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी करत निदर्शने केली.Power cut as Shah reaches Chennai airport, BJP accuses of lax security; DMK leader said- CBI probe

प्रत्युत्तरात द्रमुक नेते टीकेएस एलांगोवन यांनी भाजपवर अनावश्यक राजकारण केल्याचा आरोप केला आहे. एलंगोवन म्हणाले- राज्यात उष्णतेमुळे महिनाभरात विजेचा वापर वाढला आहे. काही वेळा वीज जाते. हे जाणूनबुजून केले जात नाही.



एलंगोवन म्हणाले- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जम्मू-काश्मीरला गेला होता, तेव्हा पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्याला जबाबदार कोण? भाजपची इच्छा असेल तर त्याचीही सीबीआय चौकशी करावी. भाजप या मुद्द्यावर राजकारण करत आहे.

वीज मंडळाने सांगितले- ग्रीडमधून पुरवठा लाइन खंडित केली

वीज मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीडमधून 230KV हायटेंशन पुरवठा लाइन खंडित झाली होती. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. केवळ विमानतळ परिसरातच नाही, तर पोरूर, सेंट थॉमस माउंट, पूनमल्ली आणि आसपासच्या परिसरातही वीजपुरवठा खंडित झाला होता.

शनिवारी रात्री 9.30 ते 10.12 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज मंडळाकडून उपलब्ध पर्यायांचा वापर करून या भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे.

Power cut as Shah reaches Chennai airport, BJP accuses of lax security; DMK leader said- CBI probe

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात