प्रवेश वर्मा यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे आणि त्यांना तीन विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rekha Gupta रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर नवीन सरकारमधील मंत्र्यांना विभागांचेही वाटप झाले आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्र्यांना त्यांचे खाते वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ५ विभाग स्वतःकडे ठेवले आहेत. तर प्रवेश वर्मा यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे आणि त्यांना तीन विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.Rekha Gupta
तर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी अर्थ खाते स्वतःकडे ठेवले आहे. त्यांनी दक्षता विभागासह एकूण पाच विभाग घेतले आहेत. त्या गृह, दक्षता आणि नियोजन विभाग देखील सांभाळतील. उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा यांच्याकडे शिक्षण, वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दिल्ली मंत्रिमंडळात शीख चेहरा म्हणून मनजिंदर सिंग सिरसा यांना आरोग्य, शहरी विकास आणि उद्योग मंत्री बनवण्यात आले आहे. तर कपिल मिश्रा यांना जल, पर्यटन, कला आणि संस्कृती ही खाती देण्यात आली आहेत. तर रवींद्र कुमार इंद्रराज यांच्याकडे समाज कल्याण, अनुसूचित जाती जमाती व्यवहार, कामगार विभागाची जबाबदारी आहे. आशिष सूद यांना महसूल, पर्यावरण, अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती सोपवण्यात आली आहेत. पंकज कुमार सिंह यांना कायदा, विधिमंडळ कामकाज आणि गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
ही आहे मंत्र्यांची संपूर्ण यादी
१. रेखा गुप्ता (मुख्यमंत्री)- गृह, वित्त, सेवा, नियोजन, दक्षता
२. परवेश वर्मा (उपमुख्यमंत्री)- शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक
३. मनजिंदर सिंग सिरसा – आरोग्य, शहरी विकास, उद्योग
४. रवींद्र कुमार इंद्रज – समाज कल्याण, अनुसूचित जाती/जमाती व्यवहार, कामगार
५. कपिल मिश्रा – पाणी, पर्यटन, संस्कृती
६. आशिष सूद – महसूल, पर्यावरण, अन्न आणि नागरी पुरवठा
७. पंकज कुमार सिंग – कायदा, कायदेविषयक व्यवहार, गृहनिर्माण.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App