मुंबईतील प्रदूषणाची पातळी अति गंभीर; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले, हवा गुणवत्ता निर्देशांक 411 वर

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची स्वत:हून दखल घेत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सातत्याने घसरत असून ती आता 411 म्हणजे अति गंभीर पातळीवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांमध्ये जनजागृती अथवा खबरदारीची सूचना देण्यासंबंधी कोणतीही पावले उचलली नाहीत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने प्रशासनावर ताशेरे ओढले.Pollution levels in Mumbai are critical; High Court slams state government, air quality index at 411



प्रसारमाध्यमांतील बातम्यांवरून मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्या. अरिफ यांनी प्रदूषणाबाबत स्वत:हून (सुमोटो) दखल घेऊन महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, बृहन्मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांना नोटिसा बजावल्या. हवा गुणवत्ता निर्देशांक 400 वरून 411 वर गेला. ही परिस्थिती गंभीर असून मुंबईकरांच्या हितासाठी सरकारने त्वरित उपाययोजना केल्या पाहिजेत असे न्यायालयाने नमूद केले आहे. न्यायालयाने यासंदर्भात महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांचेही साहाय्य मागितले आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांक गंभीर पातळीवर
​​​​
मुंबईत हवा गुणवत्ता निर्देशांक 411 या अति गंभीर पातळीवर पोहोचला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक हा 0 ते 50 उत्तम, 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 ठीक, 201 ते 300 असमाधानकारक, 301 ते 400 गंभीर, 400च्या वर अति गंभीर मानला जातो. दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग पाचव्या दिवशी अत्यंत खराब आहे. बुधवारी सकाळी दिल्लीचा सरासरी एक्यूआय 336 होता.

Pollution levels in Mumbai are critical; High Court slams state government, air quality index at 411

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात