नंदीग्राममधले मतदान संपले, विजय – पराभवाचे दावे झाले; निवडणूक आयोगाकडे तृणमूळच्या तक्रारी सुरूच

वृत्तसंस्था

नंदीग्राम – हाय व्होल्टेज मतदारसंघ नंदीग्राममधले मतदान संपले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे हेवीवेट उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचे विजय – पराभवाचे दावे – प्रतिदावेही करून झाले, पण तृणमूळ काँग्रेसच्या तक्रारी संपायला तयार नाहीत. Polling in Nandigram ended, victory-defeat claims were made; Trinamool complaints continue to be lodged with the Election Commission

नंदीग्राममधील काही बूथवर घडलेल्या गैरप्रकारांबद्दल निवड़णूक आयोगाकडे तक्रार करण्याचा विचार आम्ही करतो आहोत, असे तृणमूळचे नेते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले. तृणमूळमध्ये नव्याने सामील झालेले नेते यशवंत सिन्हा यांनी ममता बॅनर्जींच्या मोठया विजयाचा दावा केला आहे. त्याचवेळी लोकशाहीविषयी चिंताही व्यक्त केली आहे.

नंदीग्राम आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसचा विजय निश्चित आहे. तरीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संदर्भात जे काही घडलेय त्याचा विचार करून आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असे डेरेक ओब्रायन यांनी सांगितले. त्यांनीही लोकशाही वाचविण्यासाठी ही तक्रार करावी लागत असल्याचा दावा केला.

ममता बॅनर्जींनी काही वेळ मतदान थांबविल्याची तक्रार सुवेंदू अधिकारी यांनी केली होती. पण निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी सुरूवातीच्या रिपोर्ट्सच्या आधारे ती फेटाळली आहे. याबाबतचा अंतिम अहवाल उद्या सायंकाळपर्यंत मागविण्यात आल्याचे आयोगाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

Polling in Nandigram ended, victory-defeat claims were made; Trinamool complaints continue to be lodged with the Election Commission

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात