काश्मीर खोऱ्यातील अब्दुल्ला + मुफ्तींच्या घराणेशाहीवर मोदी परिवाराचा राजकीय सर्जिकल स्ट्राइक!!

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील अब्दुल्ला आणि मुफ्तींच्या घराणेशाहीवर मोदी परिवाराने आज राजकीय सर्जिकल स्ट्राइक केला. जम्मू कश्मीर मधील 370 कलम उठविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच जम्मू-काश्मीरचा एवढा मोठा व्यापक दौरा केला आणि श्रीनगर मधल्या बक्षी स्टेडियम मध्ये तब्बल 6700 कोटी रुपयांच्या 53 सरकारी परियोजना लोकार्पित केल्या. यावेळी प्रथमच बक्षीस स्टेडियम मधल्या स्टेजवर अब्दुल्ला परिवार किंवा मेहबूबा मुफ्ती परिवार यापैकी कोणीच हजर नव्हते. किंबहुना हेच या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. Political surgical strike by Modi family on Abdullah + Mufti dynasty in Kashmir valley

जम्मू-काश्मीरचे संपूर्ण राजकारण विशेषतः काश्मीर खोऱ्यातले राजकारण ही आपल्याच परिवारांची मिरासदारी असल्याची अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या परिवाराची धारण आहे. पण ही धारणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडीत काढली. जम्मू-काश्मीरमध्ये ते केवळ श्रीनगरच्या बक्षी स्टेडियम मधल्या कार्यक्रमात हजर राहिले असे नाही, तर त्यांनी काश्मीर खोऱ्यातल्या शोपियां, गंदरबल, जम्मू, श्रीनगर, कुपवाडा, बांदिपुरा, कथुआ आणि किश्तवाड इथल्या लाभार्थी युवक – युवतींशी व्हर्च्युअल संवाद साधला आणि हाच नेमका काश्मीर मधल्या अब्दुल्ला + मुफ्तींच्या घराणेशाहीवर सर्जिकल स्ट्राइक ठरला!!

कारण वर उल्लेख केलेले सगळे जिल्हे आणि शहरे आत्तापर्यंत कायम फक्त आणि फक्त दहशतवादांच्या बातम्या संदर्भात चर्चेत असायचे. दहशतवादी हल्ले आणि त्यानंतर सुरक्षा दलांशी चकमकी याच्याच बातम्यांमुळे ही शहरे आणि जिल्हे माध्यमांमध्ये चर्चेत राहायची. इथले सगळे राजकारण अब्दुल्ला आणि मुफ्ती यांच्याच परिवारांभोवती केंद्रीत राहिले. बाकीच्या कुठल्याच पक्षांचे त्यांनी तिथे राजकीय अस्तित्वच शिल्लक ठेवले नव्हते.

पण आजचे चित्र बरेच वेगळे ठरले. या सगळ्या जिल्हे आणि शहरांमधून लाभार्थी युवक – युवती सरकारी कार्यक्रमात जमले होते. बक्षी स्टेडियमवर 25000 लाभार्थी युवक – युवती जमले होते आणि या सगळ्यांशी मोदींनी सरकारी धोरण आणि योजना, त्यांचे लाभ, त्यांच्यातले फायदे – तोटे, अडचणी, उणीवा आणि उपाय योजना याविषयी थेट आणि सविस्तर चर्चा केली, जी आत्तापर्यंत क्वचितच एखाद्या पंतप्रधानाने केली असेल!!

मोदींची ही कार्यपद्धती देशातल्या इतर भागात परिचित आहे. त्यांचे व्हर्च्युअल संवाद देखील परिचित आहेत, पण श्रीनगर मधल्या आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, पंतप्रधान मोदींनी जम्मू – काश्मीर मधल्या दहशतवादाच्या सावटाखाली असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यांमधल्या आणि शहरांमधल्या युवकांची थेट आणि व्हर्चुअल संवाद साधला. आणि या संवादामध्ये सरकारी योजनांमधून थेट लाभ आणि विकास हाच विषय चर्चेचा ठरला. हा खऱ्या अर्थाने मोदी परिवाराने अब्दुल्ला आणि गोष्टींच्या परिवार वादावर केलेला सर्जिकल स्ट्राइक ठरला!!

Political surgical strike by Modi family on Abdullah + Mufti dynasty in Kashmir valley

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात