पहलगाम खाल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानला धडा शिकवायचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांनी त्यांचे टार्गेट, वेळ आणि मोडस ऑपरेंडी ठरवावी. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे कारवाईचे स्वातंत्र्य (operational freedom) दिले जाईल, अशा स्पष्ट शब्दांत मोदींनी भारतीय सैन्य दलांच्या तिन्ही प्रमुखांना आश्वासित केले.
भारतीय सैन्य दलाच्या सर्व प्रकारच्या क्षमतांवर 140 कोटी भारतीयांचा पूर्ण विश्वास आहे. सैन्य दलांनी बिनधास्तपणे मोकळेपणाने त्यांचे काम करावे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांचा आत्मविश्वास वाढविला.
भारतीय सैन्य दलांच्या निर्णयांमध्ये अनेकदा राजकीय हस्तक्षेप व्हायचा. हा अनुभव भारतीय सैन्य दलाने किमान 60 वर्षे घेतला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून संपूर्ण operational freedom मिळाल्याने भारतीय सैन्य दलांचा आत्मविश्वास प्रचंड उंचावला आहे.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी 7, लोक कल्याण मार्ग या आपल्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सैन्य दलाच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान, जनरल उपेंद्र द्विवेदी, ऍडमिरल दिनेश त्रिपाठी, एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांची बैठक घेतली या बैठकीत मोदींनी सर्वांकडून भारतीय सैन्य दलाच्या तयारीचे इनपुट घेतले. त्यानंतर या सर्वांना पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य (operational freedom) बहाल केले.
दहशतवाद पूर्ण निपटून काढण्यासाठी देशाने प्राधान्य दिले आहे. त्यात कुठलीही कुचराई होता कामा नये. दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी सैन्य दलांनी त्यांची टार्गेट्स, वेळ आणि मोडस ऑपरेंडी ठरवावी. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सैन्य दलांना पूर्णपणे मोकळीक आहे. त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असे आश्वासन मोदींनी दिले.
मोदींनी दिलेल्या या आश्वासनाला भारतीय सैन्य दलांच्या इतिहासात खरंच खूप महत्त्व आहे. कारण सैन्य दलाने शत्रु भूमी जिंकावी आणि भारतीय राजकीय नेतृत्व आणि ती वाटाघाटींच्या टेबलावर गमवावी हा अनुभव भारतीय सैन्य दलांनी गेल्या 60 वर्षांत घेतला होता.
– 1948 च्या युद्धात पाकिस्तानने कबिल्यांच्या रूपात सैन्य दलच जम्मू काश्मीरवर धाडले होते. पण त्यावेळी जम्मू काश्मीर रियासत भारतात दाखल झाली नव्हती म्हणून भारत कायदेशीर पातळीवर तिथे हस्तक्षेप करू शकत नव्हता. जम्मू काश्मीरचे राजे हरिसिंग यांनी सामीलनाम्यावर स्वाक्षरी केली म्हणून भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानच्या सैन्य दलाविरुद्ध कारवाई करायची संधी मिळाली. भारतीय सैन्य दल तिथे विमानाने पोहोचले. अखनूर क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याला पूर्णपणे मागे रेटले. पाकिस्तानी सैन्याच्या कब्जात येण्यापासून श्रीनगरला वाचवले. बडगाम आणि पंडू इथल्या लढाईत पाकिस्तानी सैन्याला पराभूत केले. संपूर्ण जम्मू काश्मीर इलाख्यातून पाकिस्तानी सैन्याला उखडून टाकण्यामध्ये भारतीय सैन्य यशस्वी होत असतानाच तत्कालीन नेहरू सरकारने शस्त्रसंधी जाहीर केली. त्यामुळे line of control अस्तित्वात आली. दोन्ही सैन्य जिथल्या तिथे थांबली आणि भारतीय सैन्याची पाकिस्तानात घुसायची संधी हुकली.
– 1965 च्या युद्धात भारतीय सैन्य लाहोर, सियालकोट पर्यंत पोहोचले होते. 11 कोअर कमांडची तुकडी लाहोरचे उपनगर बाटापूर पर्यंत पोहोचली होती. 1 कोअर कमांडची तुकडी सियालकोट पर्यंत पोहोचली होती. या दोन्ही तुकड्यांमध्ये तब्बल 40 हजार भारतीय फौज होती. भारतीय फौजांनी पाकिस्तानची तब्बल 1920 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 740 चौरस मैल भूमी ताब्यात घेतली होती. पण ताश्कंद मध्ये झालेल्या भारत – पाकिस्तान करारात लालबहादूर शास्त्री यांच्या सरकारने ही भूमी सोडून दिली.
– 1971 च्या युद्धात भारताने स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती केली. इंदिरा गांधींनी पाकिस्तान तोडला. पूर्व पाकिस्तानातले म्हणजेच बांगलादेश मधले तब्बल 94 हजार पाकिस्तानी सैनिक भारतीय सैन्यापुढे शरण आले. त्यावेळी पाकिस्तानच्या ताब्यात असलेली सर्व भारतीय भूमी त्यांच्या कब्जातून सोडवून घेता आली असती. पाकिस्तानला पाकव्याप काश्मीरवरचा ताबा सोडावा लागला असता. पण शिमला कराराद्वारे इंदिरा गांधींनी पाकिस्तानपासून “शांतता” विकत घेतली. त्यांचे 94 हजार सैन्य बिनशर्त सोडून दिले, पण पाकिस्तानचा कायमचा तुकडा पाडला.
– पाकिस्तानी घुसखोरांनी बळकावलेले पॉईंट्स कारगिलच्या मर्यादित युद्धात भारताने परत मिळवले. त्यानंतर आग्रा समिट झाली. त्यावेळी line of control हिलाच कायमची सीमारेषा म्हणून मान्यता द्यायची असे परवेज मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी ठरवत आणले होते. पण दोन्ही बाजूंच्या विशिष्ट शक्तींनी ते घडू दिले नाही, हा दावा परवेज मुशर्रफ यांनी नंतर केला. पण अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडून त्या दाव्याची पुष्टी झाली नाही.
– सर्जिकल आणि एअर स्ट्राईक मध्ये भारतीय सैन्यदले पाकिस्तानी भूमीत घुसली. आपापली टार्गेट पूर्ण करून ती वापस आली. त्यावेळी मोदी सरकारने भारतीय सैन्याला पाकिस्तानात घुसायची खुली सूट दिली होती. त्यानंतर 370 कलम काश्मीर मधून हटले. त्यानंतर पाच वर्षांनी पहलगाम हल्ला झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App