निवृत्ती – राजीनामा वगैरे राजकीय नाट्यानंतरच घराणेशाही पक्षांमध्ये खांदेपालट, हा तर खरा इतिहास!!

विशेष प्रतिनिधी 

निवृत्ती – राजीनामा वगैरे राजकीय नाट्ये सार्वजनिक चव्हाट्यावर सादर केल्यानंतरच घराणेशाही असणाऱ्या पक्षांमध्ये खांदेपालट झाल्याची इतिहासाची साक्ष आहे. त्याला कोणताही घराणेशाही पक्ष अपवाद नाही. Political drama inevitable in Dynasty politics while changing the guards

भाजप आणि कम्युनिस्ट अपवाद

भाजप आणि कम्युनिस्ट या दोन पक्षांमध्ये टोकाचे राजकीय संघर्ष जरूर होतात, पण सर्वोच्च पदांसाठी मात्र तिथे घराणेशाहीतून निवृत्ती अथवा राजीनामा नाट्य घडल्याची उदाहरणे नाहीत. कोणत्याही राजकीय घराण्यांना या दोन पक्षांमध्ये तशी संधीच दिली जात नाही. भाजप आणि कम्युनिस्ट या दोन्ही पक्षांची संघटनात्मक राजकीय जडणघडणच घराणेशाहीच्या पलीकडची आहे. भाजपमध्ये आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, मंत्री यांची मुले लोकप्रतिनिधी होऊ शकतात, पण भाजप मधले निर्णायक सर्वोच्च पद त्यांना मिळेलच याची कोणतीही गॅरंटी नाही. जे भाजपचे तेच कम्युनिस्ट पार्टीचे. तिथेही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यात घराण्याची परंपरा दिसते. पण पक्षाच्या निर्णायक सर्वोच्च पदांवर घराणेशाहीच्या परंपरेतून काही मिळत नाही.

याच्या नेमकी उलटी अवस्था काँग्रेस सारख्या राष्ट्रीय आणि बाकीच्या प्रादेशिक पक्षाची आहे.
काँग्रेस हा जरी राष्ट्रीय पक्ष असला तरी जेव्हा नेहरू – गांधी घराण्यातील अध्यक्षांच्या सावटाखाली पक्ष राहिला, तेव्हा देखील तेथे निवृत्ती – नाराजी आणि राजीनामा अशी राजकीय नाट्ये घडलीच आणि त्यानंतरच नेहमी काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षपदाचे खांदेपालट झाले.

काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष

खुद्द नेहरूंच्या काळात पुरुषोत्तमदास टंडन लोकशाही मार्गाने निवडून आले. 1950 मध्ये नाशिकच्या अधिवेशनात ते अध्यक्ष झाले. पण नेहरूंचे असहकार्य पाहून त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. त्यानंतर बाकी कोणीही अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याचे धैर्य दाखवले नव्हते. त्यामुळे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्वतःच 9 वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आणि 1959 त्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाची सूत्रे ही कन्या इंदिरा गांधींकडे सोपविली होती.

त्यानंतर काँग्रेसमध्ये नेहरू – इंदिरा – राजीव आणि सोनिया या गांधींच्या प्रभावाखालचेच अध्यक्ष बसले आहेत किंवा घराण्याचे अध्यक्ष झाले आहेत.

ही काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाची अवस्था आहे, तर बाकीच्या प्रादेशिक घराणेशाहीची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.



मुलायम सिंहांचे निवृत्ती नाट्य

उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव यांच्या निवृत्ती नाट्यानंतरच समाजवादी पार्टीची सूत्रे अखिलेश यादव यांच्याकडे गेली. मुलायम सिन्हांना कोणतीही कल्पना नसताना न देता अखिलेश यादव यांनी समाजवादी पार्टीवर संघटक संघटनात्मक कब्जा केला आणि मुलायम सिंह समाजवादी पार्टीचे “पालक” – “मार्गदर्शक” – “पितामह” या खुर्चीवर कायमचे विराजमान करून टाकले. थोडक्यात समाजवादी पार्टी मधल्या सत्तेच्या आणि संघटनेच्या निर्णयाक घटना घडामोडींपासून अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह कायमचे बाजूला करून टाकले होते. समाजवादी पार्टीतल्या या घडामोडींमुळे मुलायम सिंहांचे भाऊ शिवपाल यादव नाराज झाले. त्यांचे अनेक वेळा राजकीय तळ्यात मळ्यातही होऊन गेले. पण आता समाजवादी पार्टीवर अखिलेश यादव यांची घट्ट पकड आहे.

राष्ट्रवादीतला मसाला तोच

राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या सध्याच्या शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यामध्ये देखील घराणेशाहीतील खांदापालटाचाच राजकीय मसाला भरला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या कार्यक्रमात काही नेत्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात एम. करुणानिधी यांच्या पक्षाचा अहवाला दिला होता. करुणानिधी यांनी व्हीलचेअर वर बसून पक्ष चालवला. त्यापेक्षा शरद पवार यांची अवस्था कितीतरी चांगली आहे, असे छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड म्हणाले.

करुणानिधींच्या पक्षातही वेगळे नाही

पण ज्या करुणानिधींचा हवाला त्यांनी दिला होता, त्यांच्या द्रमूक मध्ये देखील एम. के. स्टालिन विरुद्ध त्यांचे बंधू अळगिरी यांचा सामना रंगलाच होता. त्यात अळगिरी बाजूला पडल्याने स्टालिन यांची द्रमूक वर पकड घट्ट झाली.

पवारांच्या निवृत्ती नाट्याचा खरा हेतू

राष्ट्रवादीमध्ये देखील अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे, रोहित पवार विरुद्ध पार्थ पवार असा संघर्ष आहेच आणि तो संघर्ष सोडवतानाच पवारांची खरी दमछाक होत आहे. हा संघर्ष आपल्या हयातीत कायमचा सुटून आपल्या मनातला अध्यक्ष बसावा, हा तर पवारांच्या निवृत्ती नाट्याचा खरा हेतू आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शरद पवारांनी शिवसेना फोडली होती. छगन भुजबळ यांना शिवसेनेतून बाहेर काढले होते. त्यानंतर शिवसेनेतून अनेक नेते बाळासाहेब यांच्या हयातीत बाहेर पडले. पण बाळासाहेबांच्या मृत्यू नंतर शिवसेना पुन्हा फुटली आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष आता 15 आमदारांचा आणि 3 खासदारांचा उरला आहे.

खांदेपालटातील अपरिहार्यता

पण जे शिवसेनेचे झाले ते आपल्या हयातीत राष्ट्रवादीचे होऊ नये. निदान आपल्या देखत तरी राष्ट्रवादीची शकले होऊ नयेत हा पवारांचा राजकीय होरा आहे. त्यामुळेच पवार निवृत्ती नाट्य घडवत आहेत. घराणेशाहीच्या पक्षांमध्ये खांदेपालट होताना ही राजकीय अपरिहार्यता आहे.

रक्ताच्याच वारसाला घराणेशाहीत किंमत

कोणताही नेता आपल्या रक्ताचाच वारस पुढे आणण्यासाठी प्रसंगी पक्षातील ज्येष्ठ – वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारून प्रसंगी त्यांचा राजकीय बळी देतो. पण आपलाच मुलगा – मुलगी अथवा नातू यांनाच पुढे आणतो, हा न टाळता आलेला इतिहास आहे!!

तपशील थोडे इकडे तिकडे

त्यामुळे राष्ट्रवादी नेमके काय होईल आणि कसे होईल??, सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कशा प्रस्थापित होतील??, याचे राजकीय तपशील थोडेफार इकडे तिकडे होतील. पण मूळ घराणेशाही तत्वात बदल होणार नाही, हे सांगायला पुन्हा राजकीय ज्योतिषाची गरज नाही!!

Political drama inevitable in Dynasty politics while changing the guards

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात