विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत दोन वैयक्तिक पदके जिंकलेल्या सुशील कुमारविरुद्ध दिल्ली पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.police booked case against Sushil kumar
छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीगीरांत झालेल्या मारहाणीत एका कुस्तीगीराचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जणांवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
छत्रसाल स्टेडियममध्ये शंभरहून जास्त कुस्तीगीर असतात. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमार तसेच अन्य लोकांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याबरोबरच जबरदस्तीने जखडून ठेवणे, जमावबंदी नियमाचा भंग करणे यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालमत्तेच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यात गोळीबारही झाल्याचे सांगितले जात आहे. त्यात कुस्तीगीर सागर धनखड जखमी झाला. त्याचे रुग्णालयात निधन झाले.
तो हरियानातील सोनीपतचा आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या येथून तीन कार तसेच डबल बॅरेल बंदूकही जप्त केली आहे. तीन कारपैकी दोन हरियानातील नोंद केलेल्या आहेत.
कार तसेच बंदुकीची मालकी कोणाकडे आहे याची चौकशी सुरू आहे. या सर्व घटनेचे सीसी टीव्ही फुटेज आम्हाला मिळाले आहेत. ते आम्ही तपासून बघत आहोत, असेही दिल्ली पोलिसांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App