पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) गँगरेप पीडितेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. पीडितेने एक व्हिडीओ जारी करून सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून ती बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी संघर्ष करत आहे, मात्र तिला न्याय मिळाला नाही. आता तिच्या मुलांचा जीवही धोक्यात आला आहे.POK gangrape victim pleads for help to India, seeks justice for 7 years, now wants to come to India to save children’s lives
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) गँगरेप पीडितेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. पीडितेने एक व्हिडीओ जारी करून सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून ती बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी संघर्ष करत आहे, मात्र तिला न्याय मिळाला नाही. आता तिच्या मुलांचा जीवही धोक्यात आला आहे.
मुझफ्फराबादच्या या पीडितेने पंतप्रधान मोदींना उद्देशून एक भावनिक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात ती म्हणतेय- मी गेली सात वर्षे न्यायासाठी लढत आहे. माझ्यावर सामूहिक बलात्कार झाला. येथील पोलीस, सरकार आणि न्यायालये मला न्याय देऊ शकत नाहीत.
भारतात आश्रय द्या, जेणेकरून मुले सुरक्षित राहतील
पीडित महिला म्हणाली- या व्हिडिओच्या माध्यमातून मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करते की, आम्हाला भारतात येण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून माझ्या मुलांचे प्राण वाचतील. माझ्या मुलांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. येथील पोलीस आणि एक राजकारणी चौधरी तारिक फारुख मला आणि माझ्या मुलांना कधीही मारतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App