विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Municipal पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली 1 जुलै 2025 रोजीची मतदारयादीच वापरली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यानंतर मतदार नावनोंदणी केलेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार या निवडणुकीत मिळणार नाही. आयोगाच्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीत सुमारे 35 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.Pune Municipal
यापूर्वीच्या महापालिका निवडणुकांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदारांची यादी घेऊन प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय फोड करण्यात येत असे. मात्र, या वेळी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट आदेश जारी केले आहेत की, स्थानिक प्रशासनाने स्वतंत्र मतदारयादी वापरू नये. फक्त आयोगाकडून पुरवलेली अधिकृत यादीच निवडणुकीसाठी ग्राह्य धरावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून स्वतंत्र यादी घेतली जाणार नाही, तर राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेली अंतिम यादीच निवडणुकीचा आधार ठरणार आहे.Pune Municipal
निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी माहिती दिली की, राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारयादी महापालिकेला प्राप्त झाली आहे. आता ती प्रभागनिहाय फोडण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 रोजी अंतिम करण्यात आलेली यादीच वापरली जाणार आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, आयोगाने याच यादीचा वापर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांसाठीही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र एकाच तारखेनुसार अंतिम यादी लागू राहील.
नवीन मतदारांना फटका
1 जुलैनंतर मतदार म्हणून नावनोंदणी केलेल्या नागरिकांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार नाही. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वयाची अट पूर्ण करून नावनोंदणी केलेल्या नव्या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही बाब अनेक मतदारसंघांमध्ये तरुण मतदारांवर परिणाम करणारी ठरू शकते, असे नमूद करण्यात येत आहे.
प्रभागरचना आणि आरक्षण प्रक्रियेला गती
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचनेला राज्य सरकारकडून मान्यता मिळालेली आहे. पुढील काही दिवसांत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीसाठी अधिकृत प्रशिक्षण प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अधिकारी व कर्मचारी यांना मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र आणि निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
2011 च्या लोकसंख्येनुसार निवडणूक
या निवडणुकीतही 2011 च्या लोकसंख्येचा आधार घेतला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीनुसार 41 प्रभाग होते. या वेळीही 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. यामध्ये 40 प्रभाग हे चार सदस्यांचे, तर एक प्रभाग पाच सदस्यांचा राहणार आहे. प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर, कात्रज आणि आंबेगाव हा सर्वांत मोठा प्रभाग असून, येथील लोकसंख्या 1 लाख 23 हजार इतकी आहे. त्यामुळे या प्रभागातून पाच नगरसेवक निवडून येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App