
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा आढावा घेतील. ही बैठक सकाळी 10.30 वाजता होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.PM Narendra Modi to chair a meeting with top govt officials on the COVID-19 situation and vaccination
PM Narendra Modi to chair a meeting with top govt officials on the COVID-19 situation and vaccination at 10:30 am today pic.twitter.com/j4srlHVJ4N
— ANI (@ANI) November 27, 2021
दरम्यान,भारत सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूष यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे म्हटलं आहे.
त्यामुळं व्हिसा संबंधी आणि देशात येण्यासाठी देण्यात आलेली सूट यामुळं देशासमोरील अडचणी वाढू शकतात त्यामुळं परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.
PM Narendra Modi to chair a meeting with top govt officials on the COVID-19 situation and vaccination
महत्त्वाच्या बातम्या
- पृथ्वीवर लघुग्रह, धूमकेतू धडकू नयेत यासाठी ‘नासा’ची महत्वाकांक्षी मोहीम सुरु
- तरुण तेजपालचा इनकॅमेरासाठीचा अर्ज खंडपीठाने फेटाळला
- कर्नाटकातील मुर्डेश्वरर दहशतवाद्यांच्या रडारवर, इसिसच्या मुखपत्रात दाखविली भग्नमूर्ती
- महाराष्ट्र : करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना राज्य शासन ५० हजार रुपयांची मदत करणार ; विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती