विरोधकांची आघाडी म्हणजे अहंकारी आघाडी असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची आघाडी म्हणजे अहंकारी आघाडी असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान म्हणाले की, लंका हनुमानाने नाही तर त्याच्या (रावणाच्या) अहंकाराने जाळली. त्यामुळे जनतेने त्यांना (काँग्रेस) ४० जागांपर्यंत मर्यादित ठेवले आहे. PM Narendra Modi says It is true that Lanka was not set ablaze by Hanuman it was set ablaze by Ravan arrogance
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘’लंका हनुमानाने जाळली नव्हती, ती त्यांच्या(रावण) अहंकाराने जाळली होती.. जनताही भगवान रामसारखी आहे आणि म्हणूनच तुम्ही(काँग्रेस) 400 वरून 40 वर आला आहात. जनतेने दोनदा पूर्ण बहुमताने सरकारला निवडून दिले पण तुम्हाला त्रास होतो की इथे गरीब कसा बसला आहे आणि तो तुम्हाला झोपू देत नाही आणि देशातील जनता तुम्हाला 2024 मध्येही झोपू देणार नाही. एक काळ असा होता की विमानात वाढदिवसाचे केक कापले जायचे, पण आज त्याच विमानात गरिबांना लस पाठवली जात आहे.’’
LIVE: PM Shri @narendramodi's reply to the No-Confidence Motion in Lok Sabha. https://t.co/koiLHm2qLg — BJP (@BJP4India) August 10, 2023
LIVE: PM Shri @narendramodi's reply to the No-Confidence Motion in Lok Sabha. https://t.co/koiLHm2qLg
— BJP (@BJP4India) August 10, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘’राज्यघटनेचे निर्माते आणि आमच्या ज्येष्ठांनी कुटुंबवादाच्या राजकारणावर टीका केली होती. घराणेशाहीमुळे सामान्य नागरिक आणि त्यांचे हक्क हिरावले जातात. कुटुंबाच्या नावावर आणि पैशावर आधारित व्यवस्थेपासून देशाला दूर जावे लागेल. काँग्रेसला परिवारवाद आवडतो, काँग्रेसला दरबारीपणा आवडतो.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App