यूपीत माफिया “खेळत” होते, इथून पुढे खऱ्या अर्थाने युवक खेळांमधून देशाचे नाव रोशन करतील – मोदी

मेरठमध्ये शानदार समारंभात मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या शिलान्यास | PM Narendra Modi laid the foundation stone of Major Dhyan Chand Sports University in Meerut, UP


वृत्तसंस्था

मेरठ : उत्तर प्रदेशात बरीच वर्षे माफियांचा “खेळ” सुरु होता. पण आता तो बंद करून खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशातले युवक खेळतील देशाचे नाव ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये रोशन करतील अशी व्यवस्था सरकार करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे. मेरठमध्ये 700 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साकार होणाऱ्या मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचा शिलान्यास पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाला, त्यावेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते.

पंतप्रधान मोदींनी शिक्षण क्षेत्रात उत्तर प्रदेशामध्ये गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. राज्यामध्ये सात ठिकाणी नवीन विद्यापीठे सुरू झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज उभे राहत आहेच त्याच बरोबर एक क्रीडा कॉलेज देखील उभे राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापिठात दरवर्षी एक हजार विद्यार्थी पदवी प्राप्त करून क्रीडा क्षेत्रात आपले करियर सुरू करतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

त्याच वेळी आधीच्या सरकारांवर मोदींनी टीकास्त्र सोडले. आधीच्या सरकारांच्या काळात उत्तर प्रदेशात माफिया “खेळत” होते. लोकांच्या जमिनी लुबाडणे, मालमत्तांवर कब्जा करणे, जबरदस्तीने वर्गणी गोळा करून क्रिकेट आणि अन्य क्रीडा स्पर्धा भरवणे हा माफियांचा “खेळ” चालू होता. पण योगी सरकार आल्यानंतर कायद्याचा दंडा चालवून माफियांचा “खेळ” बंद करण्यात आला. योगी सरकारमुळे माफियांनी उत्तर प्रदेशातून पळून जाण्याचा “खेळ” सुरू केला आहे. त्यांचा आता जेलमध्ये “आत – बाहेरचा खेळ”ही सुरू आहे, असे टोले नरेंद्र मोदी यांनी लगावले.

नवीन शैक्षणिक धोरण यावर भाष्य करताना मोदी म्हणाले, की धोरणात केंद्र सरकारने गणित – विज्ञान यासारख्या महत्त्वाच्या विषयांच्या बरोबरीने क्रीडा क्षेत्राला स्थान दिले आहे. मुला-मुलींच्या आवडीचा क्रीडाप्रकार हा अभ्यासक्रमातला अनिवार्य विषय असेल आणि त्याला विज्ञान गणिता इतकेच महत्त्व असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

PM Narendra Modi laid the foundation stone of Major Dhyan Chand Sports University in Meerut, UP

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात