वृत्तसंस्था
कुर्नूल :PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे १३,४३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, २०४७ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याचा १०० वा वर्धापन दिन साजरा करेल, तेव्हा तो “विकसित भारत” असेल. “मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की २१ वे शतक हे भारताचे १४० कोटी भारतीयांचे शतक असेल,” असे ते म्हणाले.PM Modi
आज जग २१ व्या शतकातील नवीन उत्पादन केंद्र म्हणून भारताकडे पाहत आहे. या यशाचा सर्वात मोठा पाया म्हणजे स्वावलंबी भारताचे स्वप्न. आपला आंध्र प्रदेश स्वावलंबी भारताचे एक प्रमुख केंद्र बनत आहे.PM Modi
तत्पूर्वी मोदींचे नंदयाल येथे आगमन झाले. त्यांनी श्रीशैलम येथील भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानला भेट दिली, पूजा केली आणि ध्यान केले. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंग आणि ५२ शक्तीपीठांपैकी एक आहे. हे एकमेव मंदिर आहे ज्यामध्ये ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ दोन्ही आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फुर्ती केंद्राला भेट दिली आणि तेथे पूजा-अर्चना केली.
मोदींनी शिवाजी स्फुर्ती केंद्रात पूजा-अर्चना केली.
पंतप्रधान मोदींनी श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रालाही भेट दिली आणि तेथे पूजा-अर्चना केली. हे एक स्मारक संकुल आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू देखील उपस्थित होते. येथे एक ध्यान कक्ष आहे, ज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रतापगड, राजगड, रायगड आणि शिवनेरी या चार प्रसिद्ध किल्ल्यांचे मॉडेल्स आहेत. मध्यभागी ध्यानस्थ अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App