सिकंदराबाद-तिरुपती ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा, तर सांयकाळी चेन्नई-कोइम्बतूर ट्रेनला रवाना करणार
विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : पंतप्रधान मोदी यांनी देशाला आणखी दोन वंदे भारत ट्रेनची मोठी भेट दिली आहे. सिकंदराबाद-तिरुपती या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय ते सायंकाळी चेन्नई-कोइम्बतूर वंदे भारत एक्स्प्रेसलाही रवाना करणार आहेत. या दोन ट्रेनमुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू व्यतिरिक्त देशातील इतर रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे. PM Narendra Modi flags off Vande Bharat Express between Secunderabad and Tirupati
सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस –
सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस तेलंगणातील सिकंदराबाद ते आंध्र प्रदेशातील तिरुपती या पवित्र शहरापर्यंत धावेल जिथे यात्रेकरू भगवान व्यंकटेश्वराची पूजा करण्यासाठी जातात. ही ट्रेन धावल्याने दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे साडेतीन तासांनी कमी होईल. यात्रेकरूंना प्रवासाची सोय आणि सुविधा देणे हा नवीन ट्रेनचा उद्देश आहे. तेलंगणातून धावणारी ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन असेल. याआधी १५ जानेवारीला पंतप्रधान मोदींनी सिकंदराबाद ते विशाखापट्टणम वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद ते तिरुपती दरम्यानचे सुमारे ६६१ किलोमीटरचे अंतर आठ तास 30 मिनिटांत पूर्ण करेल. ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
https://youtu.be/fuW6Kt2L35Q
#WATCH | Telangana | PM Narendra Modi flags off Vande Bharat Express between Secunderabad and Tirupati. It will reduce the travel time between the two cities by almost three and a half hours. pic.twitter.com/UCMd6yuWqC — ANI (@ANI) April 8, 2023
#WATCH | Telangana | PM Narendra Modi flags off Vande Bharat Express between Secunderabad and Tirupati.
It will reduce the travel time between the two cities by almost three and a half hours. pic.twitter.com/UCMd6yuWqC
— ANI (@ANI) April 8, 2023
चेन्नई-कोइम्बतूर वंदे भारत एक्सप्रेस –
चेन्नई-कोइम्बतूर वंदे भारत एक्सप्रेस ही चेन्नईहून धावणारी दुसरी वंदे भारत ट्रेन असेल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान मोदींनी चेन्नईहून म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. नवीन वंदे भारत ट्रेनला एका कार्यकारी कोचसह आठ डबे असतील. एकूण ५३० लोक ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील. ट्रेन ६ तास १० मिनिटांत ४९५.२८ किमी अंतर कापून तिरुपूर, इरोड आणि सेलम स्थानकावर थांबेल. माहितीनुसार ही ट्रेन बुधवार वगळता सर्व दिवस धावणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App