वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याबाबत राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने धक्कादायक खुलासा केला आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या या दौऱ्याला दौऱ्याला जैश-ए-मोहम्मदने टार्गेट केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोटदेखील एनआयएने केला आहे. जैशचा म्होरक्या मसूद अजहरनेच हा कट रचल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. PM Modi’s rally targeted by Jaish-e-Mohammed
यंदा एप्रिलमध्ये मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी एका झालेल्या घटनेबाबत चौकशी आणि तपास केला असता त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कारण २४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. मोदींच्या दौऱ्याच्या ४८ तास आधी म्हणजेच २१ आणि २२ एप्रिलच्या दरम्यान अतिरेकी आणि सैन्य दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्थान घातले होते. त्यात एक जवान शहीर झाले तर ४ जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.
मोदींच्या रॅलीपूर्वी जैशच्या ६ दहशतवाद्यांनी जम्मूमध्ये सीआयएसएफच्या बसवर हल्ला देखील चढवला होता. यावेळी झालेल्या चकमकीत दोघांचा खात्मा करण्यात आला होता. मोदींच्या रॅलीवरच या दहशतवाद्यांचा निशाणा होता, असे चौकशी आणि तपासातून बाहेर आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App