PM Modi : हिंदुहृदयसम्राटांच्या जन्मशताब्दीस मोदींकडून आदरांजली; मराठीतून पोस्ट- बाळासाहेबांचं नेतृत्व आजही प्रेरणादायी!

PM Modi

विशेष प्रतिनिधी

मुंबई : PM Modi  महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आदरांजली वाहिली आहे. आज, 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून याच दिवसापासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. या विशेष प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर करत बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे दोन छायाचित्रे शेअर करत, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य याविषयी गौरवोद्गार काढले आहेत.PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानावर प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी भाषेतून करण्यात आलेल्या या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये आणि बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो समर्थकांमध्ये विशेष भावनिक वातावरण निर्माण झालं आहे. पंतप्रधानांनी मराठीतून संदेश देत बाळासाहेबांच्या विचारांप्रती असलेला आदर पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.PM Modi



नरेंद्र मोदी यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले. त्यांनी म्हटलं आहे की, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणी यासाठी बाळासाहेब ओळखले जात होते. जनतेशी त्यांचं एक वेगळंच नातं होतं, जे इतर नेत्यांपेक्षा त्यांना वेगळं ठरवत होतं. राजकारणापुरतेच मर्यादित न राहता, बाळासाहेबांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. त्यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर आजही स्पष्टपणे दिसून येतो, असंही मोदींनी नमूद केलं.

पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रकार म्हणून असलेल्या कारकिर्दीचाही विशेष उल्लेख केला. व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजातील वास्तव, विसंगती आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी निर्भयपणे भाष्य केलं, असं मोदींनी म्हटलं आहे. समाजाचं सूक्ष्म निरीक्षण आणि धारदार शैली हे त्यांच्या व्यंगचित्रांचं वैशिष्ट्य होतं. याच स्पष्टवक्तेपणा आणि निर्भय भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरे सामान्य जनतेचे नेते म्हणून ओळखले गेले. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू, असंही मोदींनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे
दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली.

तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते.

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.

PM Modi Pays Rich Tribute to Balasaheb Thackeray on Birth Centenary

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात