विशेष प्रतिनिधी
कानपूर – उत्तर प्रदेशातील यापूर्वीच्या सरकारांनी माफियावादला एवढ्या मोठ्या प्रमाणावर खतपाणी घातले की, राज्यातील उद्योग व व्यापाराचा विनाश झाला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली आहे.PM Modi targets opposition leaders
बीना-पंकी पाईपलाइन प्रकल्प व कानपूर मेट्रोच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधानांनी आयआयटी ते गीता नगर स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. याबद्दल ते म्हणाले, की या मेट्रोमुळे उत्तर प्रदेशच्या विकासात आणखी एक सुवर्णअध्याय लिहिला गेला आहे.
कानपूरला स्वत:ची मेट्रो मिळाली आहे. या मेट्रोतून प्रवास करण्याचा अनुभव संस्मरणीय होता. त्याबद्दल कानपूरमधील रहिवाशांचे त्यांनी अभिनंदन केले. कानपूर मेट्रो प्रकल्प ३२ किलोमीटरचा असून ११ हजार कोटींचा आहे. त्यापैकी आयआयटी कानपूर ते मोती झील स्थानकांदरम्यानचा नऊ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे.
मोदी म्हणाले, की उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यात कायदा व सुव्यवस्थेची घडी पुन्हा बसविली. त्यामुळे, उत्तर प्रदेशातील गुंतवणूक पुन्हा वाढत असून जामीन रद्द झाल्याने राज्यातील गुन्हेगारही पुन्हा तुरुंगात जात आहेत. केंद्र व उत्तर प्रदेशातील भाजपचे ‘डबल इंजिन’चे सरकार विकासासाठी वेळ वाया न घालविता ‘डबल स्पीड’ने काम करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App