राहुल गांधी “पंतप्रधान” झाल्याचा काँग्रेसने आणला आव; पवारांच्या पंतप्रधान पदाच्या क्षमतेचा मोदींनी घातला घाव!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधी “पंतप्रधान” झाल्याचा काँग्रेसने आणला आव, पण नेमके टाइमिंग साधून मोदींनी पवारांच्या पंतप्रधान पदाचा घातला घाव!!, असे राजधानीत घडले आहे. PM Modi targets Congress over sharad pawar’s prime ministerial capacity

देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवल्याबद्दल राहुल गांधींना कनिष्ठ न्यायालयांनी सुनावलेली शिक्षा सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगित केली. त्यामुळे त्यांची आधी रद्द झालेली खासदारकी पुनरुज्जीवीत झाली आणि ते लोकसभेत दाखल झाले. पण काँग्रेसने मात्र हा आपला प्रचंड मोठा विजय मानत राहुल गांधी जणू पंतप्रधान झाल्याचा आव आणला. आता त्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाइमिंग साधून शरद पवारांच्या पंतप्रधान पदाच्या क्षमतेचा घाव घातला.

– त्याचे झाले असे :

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए मधल्या विविध पक्षांच्या खासदारांना गटा गटाने भेटत आहेत. यापैकी महाराष्ट्रातल्या खासदारांची त्यांनी काल महाराष्ट्र सदनात येऊन बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी महाराष्ट्राशी संबंधित अनेक विषय मांडले. पण त्याचवेळी त्यांनी शरद पवारांच्या पंतप्रधान पदाच्या क्षमतेचा उल्लेख केला. हा उल्लेख त्यांनी काँग्रेसला डिवचण्यासाठी केला होता. शरद पवार यांची पंतप्रधान पदाची क्षमता आहे, पण काँग्रेसने त्यांना कायम डावलले. इतकेच काय पण अनेक नेत्यांची काँग्रेसने नेहमीच अवहेलना केली, असे टीकास्त्र पंतप्रधान मोदींनी सोडले.



त्याचवेळी मोदींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची कहाणी देखील खासदारांना नेमकेपणाने सांगितली. शिवसेना आणि भाजप यांची युती असताना देखील सामनातून भाजपवर नेहमी टीका व्हायची पण भाजपने त्या टीकेला कधी प्रत्युत्तर दिले नाही. उद्धव ठाकरे स्वतःहून युतीतून बाहेर पडले. त्यांच्यासारखेच नितीश कुमार हे देखील स्वतःहून युतीतून बाहेर पडले. भाजपने कोणालाही एनडीए आघाडीतून बाहेर काढले नाही. अनेक नेते स्वतःचे राजकारण साधून घेण्यासाठी बाहेर पडले, याची उदाहरणे पंतप्रधान मोदींनी खासदारांना सांगितली.

मोदींची वक्तव्ये पवारनिष्ठांसाठी भांडवल

पण पवारांच्या पंतप्रधान पदाचा उल्लेख त्यांनी काँग्रेसला डिवचण्यासाठी केला. पण शरदनिष्ठ गटाचे नेत्यांना मोदींच्या हे वक्तव्य राजकीय भांडवल करण्यासाठी आयते हाती लागले. आत्तापर्यंत अनेकदा मोदींनी शरद पवार यांच्या नेतृत्वाची स्तुती केली आहे. आपण शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो हे त्यांनी बारामतीत जाऊन सांगितले होते. मोदींच्या या वक्तव्यांचे राष्ट्रवादीने कायम राजकीय भांडवल करून शरद पवारांचे महिमा मंडन वाढवले. आता देखील मोदींनी पवारांच्या पंतप्रधान पदाच्या क्षमतेचा उल्लेख काँग्रेसला डिवचण्यासाठीच केला, पण आता त्याचे राजकीय भांडवल शरदनिष्ठ गट करणार आहे.

PM Modi targets Congress over sharad pawar’s prime ministerial capacity

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात