वृत्तसंस्था
नवी दिल्ली : PM Modi पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर शांतता होती. पण पाच दिवसांनंतर परिस्थिती सामान्य होत आहे. २५ एप्रिल रोजी येथे फक्त ११० पर्यटक आले. २६ तारखेला ही संख्या ४०० पर्यंत वाढली. २७ एप्रिल रोजी ६०० पर्यटक आले. म्हणजेच दोन दिवसांत १००० हून अधिक पर्यटक पहलगामला पोहोचले. हल्ल्यापूर्वी येथे दररोज ७ हजारांवर पर्यटक येत असत. हल्ल्यानंतर प्रशासनाने परिसर सील केला आणि पर्यटन पूर्णपणे ठप्प झाले. आता हळूहळू पर्यटक परतू लागले आहेत.PM Modi
हल्ल्यानंतर ८०% बुकिंग रद्द, आता पुन्हा बुकिंग सुरू होतेय: काश्मीर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मुश्ताक अहमद चाया म्हणाले की, हल्ल्यानंतर काश्मीरमधील सुमारे ८०% बुकिंग रद्द करण्यात आले. हॉटेल्स रिकामी होती. पण आता परिस्थिती सामान्य होत आहे. पर्यटक पुन्हा बुकिंग करत आहेत. रविवारी काही बॉलीवूड सेलिब्रिटी पहलगाममध्ये पोहोचले. त्यांच्या आगमनामुळे स्थानिक लोक आणि पर्यटकांत आत्मविश्वास वाढला. प्रशासनानेही कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. बंगळुरूहून आलेले योगेशकुमार म्हणाले की, दहशतवादी आम्हाला घाबरवू शकत नाहीत. त्यांना दाखवून द्यायचे आहे की आमचे धैर्य त्यांच्यापेक्षा बलवान आहे. प. बंगालहून कुटुंबासह आलेले महेश बॅनर्जी म्हणाले, सुरुवातीला मला भीती वाटत होती, परंतु स्थानिकांच्या उत्साहामुळे आत्मविश्वास वाढला.
‘देशाची एकता ही मोठी शक्ती’
पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवादाविरुद्ध या युद्धात १४० कोटी भारतीयांची एकजूटता हीच सर्वात मोठी शक्ती आहे. हीच एकता दहशतवादाच्या विरोधात आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्या संकल्पांना मजबूत केले पाहिजे.
‘सगळे जग आपल्यासोबत’
मोदी म्हणाले, भारतात आक्रोश आहे. तोच जगभरातही आहे. मलाही जागतिक नेत्यांचे फोन आले. पत्रही मिळाले. या दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला. संपूर्ण जग दहशतवादाच्या विरोधातील लढाईत १४० कोटी भारतीयांच्या सोबत आहे.
‘काश्मीर उद्ध्वस्ततेचे मनसुबे’
पंतप्रधान मोदी म्हणाले, काश्मीरमध्ये शांतता नांदत होती. लोकशाही बळकट होत होती. पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती. देश व जम्मू-काश्मीरच्या शत्रूंना हे पाहवले नाही. दहशतवादी व त्यांचे म्होरके काश्मीरला उद्ध्वस्त करू इच्छितात.
तिकडे बंकर्सची सफाई सुरू
भारत व पाकमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर तणावामुळे जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील गावांमधील लोक सतर्क झाले. कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीला तोंड देण्यासाठी बंकर्सची साफसफाई व गरजेच्या सामानाची व्यवस्था केली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेजवळ १ हजारांहून जास्त बंकर आहेत. त्यापैकी काही बंकर सीमेपासून शून्य ते तीन किमी क्षेत्रात आहेत. जाड सिमेंटच्या भिंतींनी हे बंकर बनलेले आहेत. त्यात ६ ते १० लोक आश्रय घेऊ शकतात. फेब्रुवारी २०२१ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदी करारानंतर या बंकरचा वापर कमी झाला होता. आता पुन्हा त्याची तयारी केली जात आहे.
सीमेवरील शेतकरी हंगामापूर्वीच कापणीच्या कामाला लागले आहेत. गोळीबार सुरू झाल्यास शेतीची हानी होईल, अशी त्यांना भीती वाटते. आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला. कोणत्याही स्थितीत जखमींना उपचाराची तयारी केली जात आहे. भारतावर कारवाईचा दबाव
माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्या म्हणण्यानुसार मोदी सरकारवर लष्करी कारवाईचा दबाव आहे. २०१६ व २०१९ मध्ये देखील भारताने दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानवर हल्ले केले होते. सरकार काश्मीरमध्ये स्थैर्य व शांतता नांदावी यासाठी प्रयत्नशील होते. परंतु त्यातच मोठा हल्ला झाल्याने सरकारची प्रतिमा मलीन होऊ शकते. परंतु परिस्थिती अनियंत्रित होण्याची शक्यता नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App