विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 79 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून आज रेकॉर्ड ब्रेक भाषण केले त्यामध्ये त्यांनी भाषणाची मिनिटेच फक्त ओलांडली नाहीत तर त्यांनी भाषणाचे विषय देखील “ओलांडले.” लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात कुठल्याही पंतप्रधानाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला नव्हता, तो उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. पण त्यामुळे काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांचा प्रचंड चडफडाट झाला. विरोधकांनी मोदींवर आणि संघावर वाटेल तशा दुगाने झोडल्या. विरोधकांचे दोघांवरचे आरोप मात्र जुनेच ठरले.PM Modi praise RSS, opposition leaders targets RSS
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात संघाच्या शताब्दीचा उल्लेख केला. संघाने गेल्या शंभर वर्षांमध्ये व्यक्ती निर्माण पासून राष्ट्र निर्माण पर्यंत महान कार्य केल्याचे सांगितले. मोदींनी आतापर्यंत स्वतःचे संघ स्वयंसेवकत्व कधीच लपवून ठेवले नव्हते. पण गेल्या 11 वर्षांमध्ये त्यांनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात संघाचा उल्लेख केला नव्हता तो पंतप्रधान पदाच्या 12 व्या वर्षात केला.
पंतप्रधानांच्या संघ स्तुतीमुळे काँग्रेस सकट पण सगळ्या विरोधकांचा चडफडाट झाला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, AIMIMए चे खासदार असदुद्दीन ओवैसी या सगळ्यांनी पंतप्रधान मोदी आणि संघावर जुनीच टीका केली. संघाने स्वातंत्र्य लढ्यात कधी भाग घेतला नाही. संघाच्या स्वयंसेवकांनी तुरुंगवास भोगला नाही. संघाने मुख्यालयावर कधी तिरंगा फडकवला नाही. संघाने आणि त्यांच्या वैचारिक गुरूंनी ब्रिटिशांना सहकार्य केले, अशी जुनीच टीका वर उल्लेख केलेल्या सगळ्या नेत्यांनी केली. त्या उलट काँग्रेसनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असा दावा सपकाळ आणि शिवकुमार यांनी केला. ओवैसी यांनी या दाव्याला दुजोरा दिला नाही.
पण असदुद्दीन ओवैसी काँग्रेसच्या नेत्यांच्या “फारच पुढे” गेले. त्यांनी संघावर आणि संघ परिवारावर चीन पेक्षा धोकादायक असल्याचा आरोप केला. चीन भारताचा एक नंबरचा शत्रू आहे पण संघ आणि संघ परिवार देशामध्ये धर्माच्या आधारावर जी फूट पाडतोय त्यामुळे तो चीन पेक्षा धोकादायक बनलाय असा चडफडाट असदुद्दीन ओवैसी यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App