पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाच्याही दबावाखाली काम नाही करत; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा निर्वाळा; ट्रम्पच्या दाव्यांना टोला!!

नाशिक : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुणाच्याही दबावाखाली बिलकूल काम करत नसल्याचा निर्वाळा रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांनी दिला. भारताच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी पुतिन यांनी राजधानी मास्कोतील क्रेमलिन मध्ये इंडिया टुडे ग्रुपच्या आज तक वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारत आणि रशिया यांच्यातल्या संबंधांविषयी आणि जागतिक राजकीय, आर्थिक आणि सामरिक परिस्थिती विषयी परखड मते व्यक्त केली. PM Modi

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्ष दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार भारत आणि पाकिस्तान यांना आपणच युद्ध थांबवायला लावले, असा दावा केला. भारतावर निर्बंध लादण्याची भाषा केली. भारताला अनेक बाजूंनी दमबाजी केली. यासंदर्भात पुतिन यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाच्याही दबावाखाली काम करत नसल्याचा निर्वाळा दिला. PM Modi

आजचा भारत हा ब्रिटिशांच्या राजवटीतला अंकित आणि गुलाम भारत नाही. हा स्वतंत्र भारत आहे. गेल्या 77 वर्षांमध्ये भारताने चांगली प्रगती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत एक शक्तिशाली देश म्हणून उदयाला आला असून आजच्या भारताशी जगातला कुठलाही देश ब्रिटिश अंकित भारताशी बोलतो तसा बोलू शकणार नाही. कारण भारत आज कुणाचेही ऐकून घेणार नाही. भारत कुणावर दबाव आणणार नाही, पण कुणाच्या दबावाखाली सुद्धा येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी जेवढे ओळखतो, त्यानुसार त्यांच्यासारखं नेता तर कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही हे मी सांगू शकतो, असा निर्वाळा व्लादीमिर पुतिन यांनी स्पष्ट शब्दांतून दिला.



– डॉलरचे वर्चस्व झुगारले

पुतिन यांनी या मुलाखतीतून आपल्या भारत दौऱ्याचा अजेंडा स्पष्ट केला. भारत आणि रशिया यांच्यातल्या विविध संबंधांची देवाणघेवाण मूळातच आपापल्या राष्ट्रीय चलनांमधून होते. काही ठिकाणी दलालांचा प्रश्न येतो, पण तो मुद्दा सुद्धा दोन्ही बाजू सामंजस्याने सोडवतात, असे सांगून पुतिन यांनी भारत आणि रशिया हे अमेरिकन डॉलरचे वर्चस्व झुगारून लावतात, असे ठळकपणे सूचित केले.

– अमेरिकेशी संयुक्त टक्कर घेण्याची तयारी

आपल्या भारत दौऱ्यापूर्वी पुतिन यांनी भारतातल्या एका मोठ्या वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन भारत आणि रशिया यांच्यातल्या पुढच्या चर्चेचा अजेंडाच जाहीरपणे set केला. भारताला संरक्षण सामग्री, अणू तंत्रज्ञान देण्याचा शब्द दिला. भारत आणि रशिया यांच्यातले संबंध जेवढे वाढतील, तेवढा जागतिक पातळीवर दोन्ही देशांचा दबदबा तयार होईल. जागतिक सत्ता संतुलनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी भारत आणि रशिया हे एकत्र येऊन करतील, याची ग्वाही दिली. डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकन दादागिरी आता पूर्वीसारखी चालू शकणार नाही, असे पुतिन म्हणाले नाहीत. पण त्यांच्या मुलाखतीचा संपूर्ण सूर तोच होता. अमेरिका आपल्या पद्धतीने आणि आपल्याला हवी तशी जागतिक व्यूहरचना आणि व्यवस्था तयार करणारा असेल, तर रशिया सुद्धा पर्यायी जागतिक व्यूहरचना आणि व्यवस्था तयार करायला कमी पडणार नाही, हे पुतिन यांनी ठळकपणे दाखवून दिले. त्यात त्यांनी कुठली लपवाछपवी केली नाही.

PM Modi never come under pressure, asserts Putin

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात