मोदी म्हणाले “संस्कृती, सर्जनशीलता आणि जागतिक कनेक्टिव्हिटीची लाट आहे”
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे रोजी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. ते मराठीत म्हणाले, “आज महाराष्ट्र स्थापना दिन आहे. माझ्या सर्व मराठी बंधू आणि भगिनींना शुभेच्छा.” यानंतर त्यांनी सर्व गुजराती समुदायाचे गुजराती भाषेत अभिनंदन केले.PM Modi
आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, १०० हून अधिक देशांमधील कलाकार, निर्माते, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकाच व्यासपीठावर जमले आहेत. ते म्हणाले, “जागतिक प्रतिभा आणि जागतिक सर्जनशीलतेचा हा संगम एक नवीन पाया रचत आहे. WAVES हे केवळ एक संक्षिप्त रूप नाही, तर ते प्रत्यक्षात संस्कृती, सर्जनशीलता आणि जागतिक संबंधांची लाट आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेव्हज समिट २०२५ चे उद्घाटन करताना भारताची सर्जनशील शक्ती आणि डिजिटल माध्यमांमध्ये होत असलेल्या बदलांवर प्रकाश टाकला. भारताच्या ” Orange अर्थव्यवस्थेची उदयोन्मुख ताकद” असे संबोधून ते म्हणाले की, आता ” Create in India, Create for the World” अशी वेळ आली आहे.
पंतप्रधानांनी सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या आणि ‘इंडिया पॅव्हेलियन’मध्ये दाखवलेल्या नवोपक्रमांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, “वेव्हज बाजार हा एक उत्तम उपक्रम आहे जो कंटेंट निर्मात्यांना खरेदीदारांशी थेट संबंध प्रदान करेल आणि त्यांना जागतिक स्तरावर संधी प्रदान करेल.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App