जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल
विशेष प्रतिनिधी
सागर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशला मोठी भेट दिली आहे. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी तब्बल ५० हजार कोटींच्या योजनांची भेट दिली आहे. याचवेळी पंतप्रधान मोदींनी इथे पेट्रोल केमिकल कॉम्प्लेक्स प्लांटची पायाभरणी देखील केली. PM Modi gave a gift of 50 thousand crores to Madhya Pradesh
यावेळी पंतप्रधानांनी तेथील लोकांना संबोधित करताना सांगितले की, ‘या प्लांटच्या स्थापनेमुळे मध्य प्रदेशातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.’ तसेच ते पुढे म्हणाले की, ”आम्ही विकासाची हमी देतो. या प्रकल्पांमुळे या भागाच्या औद्योगिक विकासाला नवी ऊर्जा मिळेल. या प्रकल्पांवर केंद्र सरकार ५० हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्याची योजना आखत आहे. तुम्ही कल्पना करा की एवढ्या पैशाचं एखाद्या संपूर्ण राज्याचं पूर्ण बजेट नसतं, परंतु भारत सरकार इथे केवळ एका कार्यक्रमासाठी एवढा पैसा लावत आहे.”
मध्य प्रदेशातील सागर येथे जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने मध्य प्रदेशचा विकास होऊ दिला नाही. काँग्रेसने बुंदेलखंडमधील जनतेला वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांसाठी तरसवलं. याआधी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कमकुवत होती आणि भाजपा सरकारने ती दुरुस्त केली. काँग्रेस सरकारने मध्य प्रदेशला लुटले. आता मध्य प्रदेशच्या विकासाला नवीन गती द्यायची आहे. मध्य प्रदेशासाठी आमचे मोठे संकल्प आहेत, योजनांमुळे लोकांना फायदा होईल. परदेशातून आयात कमी करणे आमचे उद्दिष्ट आहे.
या अगोदर मोदींनी विविध परियोजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या दरम्यान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींना सांची स्तूपाचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App