पीएम मोदींनी व्हिएतनामच्या नव्या पंतप्रधानांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले- पुढेही परस्पर सहकार्य सुरू राहील

PM Modi congratulates new Vietnamese PM, says co-operation will continue

PM Modi congratulates new Vietnamese PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते फाम मिन्ह चिन यांच्याशी फोनवर बोलून पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली भारत-व्हिएतनाम सर्वसमावेशक रणनीतिक भागीदारी आणखी मजबूत होत राहील. यादरम्यान त्यांनी फाम मिन्ह चिन यांना भारतात येण्याचे आमंत्रणही दिल्याचे सांगितले जात आहे. PM Modi congratulates new Vietnamese PM, says co-operation will continue


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते फाम मिन्ह चिन यांच्याशी फोनवर बोलून पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली भारत-व्हिएतनाम सर्वसमावेशक रणनीतिक भागीदारी आणखी मजबूत होत राहील. यादरम्यान त्यांनी फाम मिन्ह चिन यांना भारतात येण्याचे आमंत्रणही दिल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत पीएम मोदी यांनी ट्वीट करून म्हटले की, व्हिएतनामचे पंतप्रधान एच.ई. फाम मिन्ह चिन यांच्याशी फोनवर बोललो. आमच्या सर्वसमावेशक रणनीतिक भागीदारीच्या सर्व बाबींचा आढावा घेतला, इंडो-पॅसिफिकसाठी आमच्या सामायिक दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला आणि यूएनएससीसह सहकार्य राखण्याचे मान्य केले.

कोरोनादरम्यान पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद

खुल्या, सर्वसमावेशक, शांतताप्रिय आणि नियमांवर आधारित हिंदी महासागराच्या क्षेत्राविषयी दोन्ही देशांची मते सारखी आहेत, या गोष्टीचे पंतप्रधान मोदींनी स्वागत केले आणि म्हणूनच भारत-व्हिएतनाम व्यापक रणनीतिक भागीदारी क्षेत्रीय स्थिरता, समृद्धी आणि विकासास चालना देऊ शकते. भारत आणि व्हिएतनाम हे दोघेही सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सहकारी सदस्य आहेत, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान दिलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी व्हिएतनामच्या सरकारचे आणि जनतेचे आभार मानले.

यासह, दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली की दोन्ही देशांनी कोरोना महामारीविरुद्ध एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी सल्लामसलत आणि सहकार्य सुरू ठेवले पाहिजे.

PM Modi congratulates new Vietnamese PM, says co-operation will continue

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात