वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे सध्या सर्वात प्रबळ दावेदार आहेत, अशा शब्दांमध्ये नॉर्वेच्या नोबेल समितीच्या सदस्याने त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. रशिया – युक्रेन युद्धामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली सर्व राजकीय मुत्सद्देगिरी पणाला लावून अणुबॉम्बचा वापर दोन्ही देशांना टाळायला लावला आहे. यातून जागतिक पातळीवरची मोठी जीवित हानी टळली आहे, असे नॉर्वेच्या नोबेल पुरस्कार समितीचे सदस्य अस्ले टोज यांनी म्हटले आहे. सध्या अस्ले टोज भारत दौऱ्यावर आले आहेत आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व कौशल्याची प्रशंसा केली आहे. ‘PM Modi Biggest Contender For Nobel Peace Prize
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुत्सद्देगिरीची छाप संपूर्ण जगावर पाडली आहे. भारत आता महाशक्ती बनविण्याच्या तयारीत आहेत. किंबहुना त्याची त्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात मोठे योगदान आहे. जागतिक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पटलावर भारताच्या आवाजाची आज फक्त दखलच घेतली जात नाही, तर भारताचा आवाज आज सर्वात प्रभावी मानला जातो. याची दखल घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदींची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस होऊ शकते, असे वक्तव्य अस्ले टोज यांनी केले आहे.
– युद्ध थांबवले, भारतीय विद्यार्थी परतले
रशिया – युक्रेन युद्ध दरम्यान पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांच्याबरोबर आपली पॉलिटिकल केमिस्ट्री उत्तमरीत्या वापरली होती. याचा प्रत्यय संपूर्ण जगाने घेतला. युक्रेन मधल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी मोदींनी जी मोहीम राबवली, त्यामुळे युद्ध काही काळ थांबले होते. मोदींच्या राजकीय प्रभावामुळे पुतिन आणि झेलेन्सकी या दोन्ही नेत्यांनी तात्पुरत्या युद्ध विरामास मान्यता दिली होती. रशियाने युक्रेन वरचे हल्ले थांबवले होते. त्यामुळे भारतीय विद्यार्थी सुखरूप परत येऊ शकले. इतकेच नाही तर अन्य देशातल्या विद्यार्थ्यांना देखील फार मोठी मदत झाली.
या वस्तुस्थितीची दखल संपूर्ण जगाने घेतली आणि नोबेल शिफारस समितीवर देखील त्याचा प्रभाव पडल्याचे दिसत आहे. यातूनच अस्ले टोज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेलच्या पुरस्काराचे सर्वात प्रबळ दावेदार आहेत, असे वक्तव्य आले आहे. आता या वक्तव्याच्या पलिकडे जाऊन नोबेल शिफारस समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी संदर्भात कोणती शिफारस करते??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App