जर तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) फायदा घेणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकारने नोंदणीची प्रक्रिया काहीशी बदलली आहे PM Kisan: Important News! This card is required for the 10th installment of the plan; Otherwise you will not get the money
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जर तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) फायदा घेणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकारने नोंदणीची प्रक्रिया काहीशी बदलली आहे. त्यामुळे आता पीएम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी रेशनकार्ड (Ration Card) अनिवार्य करण्यात आले आहे. अर्थात आता तुम्हाला रेशन कार्ड असल्याशिवाय पीएम शेतकरी सन्मान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी नाही करू शकत. शिवाय रेशन कार्ड अनिवार्यतेसह आता नोंदणीदरम्यान कागदपत्रांची केवळ सॉफ्टकॉपी (PDF) बनवून पोर्टवर अपलोड करावी लागेल.
पीएम किसान योजनेसाठी नोंदणीच्या नवीन प्रणाली अंतर्गत, यापुढे रेशन कार्ड क्रमांकाशिवाय नोंदणी करणे शक्य होणार नाही. या व्यतिरिक्त आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता दूर केली गेली आहे. आता पोर्टलवर कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून अपलोड करावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. तसेच नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची योजना आखत आहे. सरकारने गेल्यावर्षी या कालावधीदरम्यानचा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App