पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) खात्यांची संख्या आणि या खात्यांमधील शिल्लक रक्कमेमुळे गुन्हेगारीत घट झाली आहे. भारत आता फायनान्शिअल इनक्लूजन मेट्रिक्समध्ये चीनच्या पुढे आहे. मात्र, आगामी काळात शाखाविरहीत बीसी (बिझनेस करस्पॉन्डंट) मॉडेल मजबूत करणे महत्त्वाचे असल्याचे अहवालात म्हटले आहे. PM JANDHAN YOJNA: Crimes reduced by Jandhan Yojana! Decrease in crime rate in states with Jandhan Bank accounts: SBI
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील ज्या राज्यांमध्ये जास्त जनधन खाती उघडण्यात आली आहेत, त्याठिकाणी गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाल्याचे निरीक्षण भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) अहवालात नोंदवण्यात आले आहे. जास्त प्रमाणात जनधन खाती असलेल्या राज्यांमध्ये दारु आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाणही कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. देशभरातील बँकांनी प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) अंतर्गत खातेदारांना मोफत अपघात विमा संरक्षण देणारी 31.67 कोटी RuPay डेबिट कार्ड जारी केली आहेत.
एसबीआयच्या अहवालानुसार, पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) खात्यांची संख्या आणि या खात्यांमधील शिल्लक रक्कमेमुळे गुन्हेगारीत घट झाली आहे. भारत आता फायनान्शिअल इनक्लूजन मेट्रिक्समध्ये चीनच्या पुढे आहे. मात्र, आगामी काळात शाखाविरहीत बीसी (बिझनेस करस्पॉन्डंट) मॉडेल मजबूत करणे महत्त्वाचे असल्याचे अहवालात म्हटले आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाने सांगितले की, ऑगस्ट 2014 मध्ये ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 43.76 कोटी जन-धन खाती उघडण्यात आली आहेत. मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रत्येक प्रौढ नागरिकाला बँकिंग सुविधा देण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेत 21 ऑक्टोबर 2021 पर्यंत जन-धन खातेधारकांना मोफत अपघात विमा संरक्षण देणारी 31.67 कोटी रूपे डेबिट कार्ड जारी करण्यात आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जन-धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती आणि काही दिवसांनी ती लागू करण्यात आली. 2018 मध्ये, सरकारने ‘प्रत्येक कुटुंबा’ऐवजी ‘प्रत्येक प्रौढ नागरिक’ला बँकिंग जाळ्यात आणण्याच्या उद्दिष्टासह जन-धन योजना 2.0 ही सुविधा सुरू केली. RuPay डेबिट कार्डवर मोफत अपघात विमा संरक्षण देखील दुप्पट करून 2 लाख रुपये करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या मार्च 2015 अखेर 14.72 कोटी होती, जी ऑक्टोबर 2021 मध्ये वाढून 43.76 कोटी झाली. सुमारे 55 टक्के खातेदार महिला आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App