विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी खासदार व वरिष्ठ वकील पिनाकी मिश्रा यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉण्डरिंग तसेच संसदेत भारताच्या संरक्षणविषयक संवेदनशील मुद्द्यांवर रशियाविरोधी प्रश्न विचारून राष्ट्रीय सुरक्षेला धक्का दिल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. बीजू जनता दलाचे नेते असलेले मिश्रा यांनी अलीकडेच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याशी विवाह केला आहे. Pinaki Mishra
२५ ऑगस्ट रोजी गृहमंत्रालय आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) येथे दाखल झालेल्या दोन तक्रारींमध्ये हे आरोप नोंदविण्यात आले आहेत. एका तक्रारीत मिश्रा यांच्या मालमत्ता खरेदी व आर्थिक व्यवहारातील अनियमितता अधोरेखित करण्यात आली आहे, तर दुसऱ्या तक्रारीत त्यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा उल्लेख आहे. या प्रश्नांमध्ये भारताच्या अणु पाणबुड्या, क्षेपणास्त्र प्रणाली आणि महत्त्वाच्या संरक्षण करारांबाबत माहिती मागविण्यात आली होती, असे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार दिल्लीतील गोल्फ लिंक आणि जोर बाग येथील दोन महागड्या बंगल्यांची खरेदी थेट न करता कंपन्यांच्या शेअर्सच्या माध्यमातून करण्यात आली, ज्यामुळे विक्री दस्तऐवजांमध्ये थेट नाव नोंदविण्याऐवजी कंपनी हस्तांतरणाच्या माध्यमातून व्यवहार झाल्याचा आरोप आहे.
याशिवाय, हाँगकाँगस्थित एका व्यक्तीकडून मिश्रा यांच्या माजी पत्नी संगीता मिश्रा यांच्या खात्यावर जमा झालेल्या ३,०५,००० अमेरिकी डॉलरच्या रकमेबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही रक्कम “प्रेम व आपुलकीतून दिलेली भेट” म्हणून दाखविण्यात आली असली तरी तक्रारदाराने हा व्यवहार अत्यंत संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.
तक्रारदाराच्या मते, हे केवळ तांत्रिक चुका नसून निधीच्या खऱ्या स्त्रोताचा शोध घेण्यासाठी सखोल तपासाची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App