Pew : भारतात मुस्लिमांशी भेदभाव नाही, त्यांना संपूर्ण धर्म स्वातंत्र्य, अमेरिकेत मात्र स्वातंत्र्य संकोच; तब्बल 98 % मुस्लिमांचा निर्वाळा

प्रतिनिधी

नवी दिल्ली : एरवी भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याच्या बनावट कथा आणि बातम्या व्हायरल करणाऱ्या अमेरिका आणि लिबरल मीडियाला Pew रिसर्च मधून जोरदार धक्का बसला आहे. कारण Pew रिसर्च म्हणून एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे मुस्लिमांना भारतात पूर्ण धर्मस्वातंत्र्य आहे. मुस्लिमांविरुद्ध कोणतीही भेदभाव केला जात नाही, असे तब्बल 98 % भारतीय मुस्लिमांना स्पष्टपणे वाटते आहे. इतकेच नाही, तर अमेरिकेत मात्र त्या तुलनेत मुस्लिमांवर बंधने लाभल्याचाही Pew ने निष्कर्ष काढला आहे Pew : There is no discrimination against Muslims in India, they have complete freedom of religion, but in America, freedom is hesitant; As many as 98% of Muslims are Nirwala

भारतातील 98% मुस्लिम म्हणतात की ते भारतात त्यांच्या धर्माचे पालन करण्यास स्वतंत्र आहेत. उरलेल्या 2% लोकांनी सांगितले की ते त्यांच्या धर्माचे पालन करण्यास “खूप मोकळे नाहीत”, अक्षरशः कोणीही “अजिबात मुक्त नाही” असे उत्तर देत नाही.



भारत आणि पाश्चात्य जगतातला मीडिया मात्र भारतात धर्म स्वातंत्र्य नाही, माध्यम स्वातंत्र्य नाही वगैरे धोषा लावत असतो. लव्ह जिहाद सारखी गंभीर प्रकरणे समोर येत असताना तो प्रकारच अस्तित्वात नाही. मुस्लिमांना भेदभावाला सामोरे जावे लागते, असे दावे करतो. या पार्श्वभूमीवर Pew रिसर्च काही वेगळेच बोलतो आहे.

भारतातील मुस्लिमांना अत्यंत खालच्या पातळीवरील भेदभावाचा अनुभव येत नसल्याची नोंद केली आहे.

या आकडेवारीच्या दृष्टीकोनातून, जेव्हा Pew ने अमेरिकन लोकांना नेमका हाच प्रश्न विचारला तेव्हा 80% आफ्रिकन – अमेरिकन, 46% हिस्पॅनिक अमेरिकन आणि 42% आशियाई अमेरिकन लोकांना अमेरिकेत धर्म वंश लिंग या आधारे भेदभाव सहन करत लागल्याचा करावा लागल्याचा निष्कर्ष नोंदवतात. अमेरिकेत त्यांना “खूप भेदभाव” सहन करावा लागतो.

भारतात मुस्लिमांविरुद्ध कोणताही भेदभाव असला तरी तो नगण्य आहे. अमेरिकेतील सर्व प्रमुख अल्पसंख्याकांच्या तुलनेत खूपच कमी गंभीर असल्याचे दिसून येते.

भारतात मुस्लिम घरसंहार किंवा मुस्लिमांवर अत्याचार वगैरे भाता पसरवणाऱ्यांना Pew रिसर्च तर एक खणखणीत चपकार आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौराचा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर लिबरल जमात विविध स्वातंत्र्यांविषयी खोट्या बातम्या व्हायरल करत असताना Pew रिसर्च वास्तववादी रिपोर्ट प्रकाशित होणे आणि त्यात भारतात मुस्लिमांविरुद्ध कोणताही भेदभावच होत नसल्याचा निष्कर्ष निघणे त्याला विशेष महत्त्व आहे.

Pew : There is no discrimination against Muslims in India, they have complete freedom of religion, but in America, freedom is hesitant; As many as 98% of Muslims are Nirwala

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात