टीआरपी कमी झालेले लोक भारत जोडो यात्रेत जातात; प्रकाश आंबेडकरांचे पुन्हा शरसंधान


प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना काँग्रेस नेते ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन वाढविण्यात मग्न आहेत, तर विरोधक त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत आहेत. विरोधकांच्या कोणत्याही टीकेकडे काँग्रेस नेते लक्ष देत नाहीत. उलट त्यांनी आपल्या सगळ्या टीकेचे सगळे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर यांच्यावरच केंद्रीत ठेवले आहे. People with reduced TRP go to Bharat Jodo Yatra; Prakash Ambedkar’s comeback

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीकास्त्र सोडले आहे. ज्या नेत्यांचा टीआरपी कमी झाला आहे, अर्थात ज्यांची लोकप्रियता कमी झाली आहे तेच नेते भारत जोडो यात्रेत सामील होऊन स्वतःचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी देखील भारत जोडो यात्रेवर टीका केली होती. भारत जोडो यात्रा उद्देशहीन आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शून्य असेल, असे ते म्हणाले होते. प्रकाश आंबेडकरांच्या या टीकेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकदाच उत्तर दिले. पण त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आंबेडकरांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.

भारत जोडो यात्रेत काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सहभागी झाले होते. आज याच यात्रेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी या यात्रेवर पुन्हा एकदा शरसंधान साधून टीआरपी कमी झालेले लोक म्हणजे ज्यांची लोकप्रियता कमी झाली आहे ते नेते भारत जोडो यात्रेत सामील होत आहेत असे टीकास्त्र सोडले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका करण्यापूर्वी अनेकदा त्या पक्षाच्या नेत्यांना वंचित बहुजन आघाडीची युती करण्याचे आवाहन केले होते परंतु काँग्रेस नेत्यांनी त्या आवाहनाकडे देखील दुर्लक्ष केले होते त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी गेल्या काही दिवसांमध्ये भारत जोडो यात्रेवरून काँग्रेसवर नेहमीच शरसंधान साधले आहे.

राहुल गांधींनी नॅशनल हेराड केसचा खुलासा करावा

त्याच वेळी प्रकाश आंबेडकर यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या नॅशनल हेरॉल्ड मनी लॉड्रिंग केसचा देखील उल्लेख केला आहे राहुल गांधी यांनी या केस संदर्भात जाहीरपणे खुलासा करावा तरच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील अन्यथा ईडी चौकशीला सामोरे गेलेला नेता आपल्याविषयी निर्णय कसा काय घेऊ शकतो?, असा संशय त्यांच्या मनात निर्माण होईल असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला.

People with reduced TRP go to Bharat Jodo Yatra; Prakash Ambedkar’s comeback

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात