पहाटे मशिदींमध्ये होणाऱ्या अजानमुळे लोकांची झोपमोड, रुग्णांचाही विचार करत नाहीत, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी

भोपाळ : पहाटे मशिदींमध्ये होणाऱ्या अजानमुळे लोकांची झोप मोड होते. रुग्णांचा देखील हे लोक विचार करत नाहीत आणि साधू-संतांच्या साधनेत यामुळे भंग होतो, असे वक्तव्य मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.People irritate  due to Ajaan taking place in mosques in the early  morning, Sadhvi Pragya Singh Thakur’s statement

भोपाळ येथे एका संमेलनात बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, इतर समुदायाच्या प्रार्थनेवेळी मोठ्या आवाजात भजन, किर्तन करु नका असं आपल्याला सांगितलं जातं. पण हे लोक पहाटे पहाटे अजान करुन लोकांची झोप मोड करतात. पहाटे ५ वाजता अजानमुळे लोकांची झोप उडते. रुग्णांना त्रास होतो. साधू-संत पूर्जा अर्चा किंवा ध्यान साधना पहाटे सुरू असते.



त्यांनाही व्यत्यय येतो. आरतीची वेळ देखील सकाळी असते आणि त्यावेळी यांचे लाऊडस्पीकर, भोंगे जोरजोरात वाजत असतात. त्याचा त्रास होतो. आम्ही हिंदू लोक सर्वधर्म समभावाचा सन्मान करतो. पण इतर कोणता धर्म असं वागतो का?

गांधी कुटुंबीयांवर निशाणा साधत प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, कुटुंबातील एका मुलाला राजकारण जमत नाही. म्हणून आता मुलीला ते घेऊन आले आहेत आणि तिही नौंटकी करत आहे.

People irritate  due to Ajaan taking place in mosques in the early  morning, Sadhvi Pragya Singh Thakur’s statement

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub