Manipur : मणिपूरच्या सात जिल्ह्यांतील लोकांनी शस्त्रे, दारूगोळा अन् बंदुका सुरक्षा दलांना सोपवल्या

Manipur

२० फेब्रुवारी रोजी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी केले होते आवाहन


विशेष प्रतनिधी

मणिपूर: Manipur अशांत मणिपूरच्या सात जिल्ह्यांमध्ये एकूण ८७ बंदुका आणि दारूगोळा सुरक्षा दलांना सुपूर्द करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. बहुतेक शस्त्रे इंफाळ पश्चिम जिल्ह्यात सुपूर्द करण्यात आली. यामध्ये १२ कार्बाइन मशीनगन, मॅगझिनसह दोन रायफल, दोन एसएलआर रायफल आणि त्यांची मॅगझिन, चार १२ बोरच्या ‘सिंगल बॅरल’ बंदुका आणि एक आयईडी यांचा समावेश आहे.Manipur

जिरीबाम जिल्ह्यात देण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये पाच १२ बोरच्या ‘डबल बॅरल’ बंदुका, मॅगझिनसह ९ मिमी कार्बाइन आणि एक ग्रेनेड यांचा समावेश होता. कांगपोक्पी जिल्ह्यात जमा करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये दोन मॅगझिनसह एके-४७ रायफल, एक रायफल, एक रिव्हॉल्व्हर, एक२२ मॅगझिनसह पिस्तूल, एक ‘सिंगल बॅरल’ रायफल आणि ग्रेनेड यांचा समावेश होता. मंगळवारी, बिष्णुपूर, थौबल, इंफाळ पूर्व आणि चुराचंदपूर जिल्ह्यांमध्येही पोलिसांना शस्त्रे सोपवण्यात आली.

२० फेब्रुवारी रोजी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी लोकांना सात दिवसांच्या आत लुटलेली आणि बेकायदेशीरपणे बाळगलेली शस्त्रे स्वेच्छेने पोलिसांकडे सोपवण्याचे आवाहन केले होते. या काळात शस्त्रे समर्पण करणाऱ्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

People from seven districts of Manipur surrendered arms ammunition and guns to security forces

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात