वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Pegasus project media reports वर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहांनी सूचक ट्विट केले आहे. असल्या भारताची बदनामी करणाऱ्या बातम्यांनी भारताची विकास यात्रा कोणी थांबवू शकणार नाही. आज सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात नवी फळे मिळतील, असे हे सूचक ट्विट आहे.Pegasus project media reports; India’s development journey will not stop, the rainy season will bring “new fruits”; Amit Shah’s suggestive tweet
Pegasus project media reports वरून काँग्रेससह सर्व विरोधकांनी आज संसदेत गदारोळ घालून घेतला. सरकारवर आपलेच मंत्री, विरोधी नेते, पत्रकार यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप केला. नवे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांना खणखणीत प्रत्युत्तर दिले. त्यांचे प्रत्येक आरोप त्यांनी खोडून काढले.
त्यानंतर सायंकाळी गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवे ट्विट करून एक नवा ट्विस्ट आणला आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, की निराधार बातम्यांवरून संसदेत गोंधळ घालून अडथळा आणणाऱ्यांचे हेतू सफल होणार नाहीत. त्यांच्या कट कारस्थानांनी भारताची विकासाची गती कमी होणार नाही.
Disruptors and obstructers will not be able to derail India’s development trajectory through their conspiracies. Monsoon session will bear new fruits of progress.https://t.co/cS0MCxe8aO — Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) July 19, 2021
Disruptors and obstructers will not be able to derail India’s development trajectory through their conspiracies. Monsoon session will bear new fruits of progress.https://t.co/cS0MCxe8aO
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) July 19, 2021
या पावसाळी अधिवेशनात विकासाची नवी फळे देशाला पाहायला मिळतील.अमित शहांनी हे सूचक ट्विट करून सरकार या पावसाळी अधिवेशनात नवे काही तरी विधेयक आणणार असल्याचेच सूचित केल्याचे मानले जात आहे.
लोकसंख्या नियंत्रण कायदा, समान नागरी कायदा यांच्या सारखे विषय सध्या देशभर मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहेत. आसाम आणि उत्तर प्रदेश यांच्या सारख्या भाजप शासित राज्यांनी त्यासाठी पुढाकार देखील घेतला आहे. तसाच पुढाकार केंद्र सरकारने घ्यावा अशी समाजातल्या मोठ्या घटकांकडून होते आहे.या पार्श्वभूमीवर अमित शहांचे “नवी फळे मिळतील”, या ट्विटला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App