Pegasus Controversy : पेगासस हेरगिरी प्रकरणावरून सर्व विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहेत. आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ओवैसी म्हणाले की, या हेरगिरी घोटाळ्यावर सरकारने काय कारवाई केली हे सरकारने त्वरित सांगावे. हेरगिरी करण्याचे सॉफ्टवेअर त्यांनी खरेदी केले होते की नाही, हेही सरकारने सांगावे. Pegasus Controversy aimim chief owaisi demands to know if centre used pegasus to snoop
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पेगासस हेरगिरी प्रकरणावरून सर्व विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहेत. आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ओवैसी म्हणाले की, या हेरगिरी घोटाळ्यावर सरकारने काय कारवाई केली हे सरकारने त्वरित सांगावे. हेरगिरी करण्याचे सॉफ्टवेअर त्यांनी खरेदी केले होते की नाही, हेही सरकारने सांगावे.
ओवेसी म्हणाले, “जर सरकारला हेरगिरी करायचीच होती तर त्यांनी चीनच्या सीमेवर जाऊन हेरगिरी करायला पाहिजे होती.” ते म्हणाले, “सरकार एवढी असुरक्षित का आहे, हे मला समजले नाही. सरकारने बेकायदेशीरपणे हेरगिरी केली आहे. म्हणूनच त्यांनी हेरगिरीसाठी सॉफ्टवेअर विकत घेतले आहे की नाही ते सांगावे लागेल व त्यांनी ते विकत घेतले असेल तर त्यांनी ते वापरले अथवा नाही हेही सांगावे.
दुसरीकडे, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पेगासस प्रोजेक्ट मीडिया रिपोर्टवर म्हटले आहे की, “यात सरकारचा सहभाग नाही, परंतु जर विरोधकांना योग्य प्रक्रियेद्वारे हा मुद्दा उपस्थित करायचा असेल तर त्यांनी हा मुद्दा उपस्थित करू द्या. आयटी मंत्री वैष्णव यांनी यापूर्वी यासंदर्भात चर्चा केली आहे. ते म्हणाले, “पीएम मोदींनी लोकांचा मुद्दा उपस्थित करण्याऐवजी विरोधकांच्या चुकीच्या समजुतीवर चिंता व्यक्त केली, कॉंग्रेसला वाटतंय की, सत्ता आणि पंतप्रधान त्यांचा हक्क आहेत. आम्ही दोन वर्षांपासून साथीच्या आजाराचा सामना करत आहोत, परंतु कॉंग्रेस अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहे.
aimim chief owaisi demands to know if centre used pegasus to snoop
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App