श्रीलंकेतही UPI द्वारे पेमेंट शक्य होणार; दोन्ही देशांनी स्वीकारले ‘व्हिजन डॉक्युमेंट’


भारत आणि श्रीलंका यांच्यात अनेक करारांची झाली  देवाणघेवाण

विशेष प्रतिनिधी

 नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या उपस्थितीत भारत आणि श्रीलंका यांच्यात अनेक करारांची देवाणघेवाण झाली. यापैकी एक करार हा श्रीलंकेत UPI स्वीकृतीसाठी नेटवर्क-टू-नेटवर्क कराराचा देखील आहे. Payment through UPI will also be possible in Sri Lanka

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्यातील व्यापक चर्चेनंतर भारत आणि श्रीलंकेने शुक्रवारी आर्थिक भागीदारीचा विस्तार करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी व्हिजन डॉक्युमेंट स्वीकारले. यादरम्यान, पंतप्रधान म्हणाले, “आज आम्ही आमच्या आर्थिक भागीदारीसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट स्वीकारले आहे. हे व्हिजन दोन्ही देशांतील लोकांमधील सागरी, हवाई, ऊर्जा आणि लोकांमधील आपसातील संपर्क मजबूत करणे आहे.”

मागील वर्षी श्रीलंकेला भेडसावलेल्या आर्थिक अडचणींचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, संकटाच्या काळात भारत एक जवळचा मित्र म्हणून बेट राष्ट्रातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. तसेच, श्रीलंकेत UPI पेमेंट सिस्टीम लाँच करण्याच्या कराराला अंतिम रूप दिल्याने दोन्ही बाजूंमधील फिनटेक कनेक्टिव्हिटी वाढेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

याशिवाय ते म्हणाले की, गेले एक वर्ष श्रीलंकेच्या लोकांसाठी आव्हानांनी भरलेले होते आणि जवळचा मित्र म्हणून भारत नेहमीप्रमाणेच श्रीलंकेच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. आपल्या वक्तव्यात पंतप्रधान मोदी हेही म्हणाले की, भारत आणि श्रीलंकेचे सुरक्षा हित आणि विकास एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकमेकांचे सुरक्षेचे हित आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन एकत्र काम करणे आवश्यक आहे.

Payment through UPI will also be possible in Sri Lanka

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात