विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘भारत जोडो न्याय यात्रे’साठी देणगी गोळा करण्यासाठी काँग्रेसने शनिवारी क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली आहे. पक्षाने याला ‘डोनेट फॉर जस्टिस’ असे नाव दिले आहे. या मोहिमेअंतर्गत देणगी देणाऱ्यांना राहुल गांधींचा ऑटोग्राफ आणि यात्रेशी संबंधित काही साहित्य असलेला टी-शर्ट मिळेल.Pay Rs 670, get Rahul Gandhi’s autographed t-shirt…Congress’ new scheme for donations
पक्षाचे खजिनदार अजय माकन यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा 67 दिवस चालणार आहे. अशा परिस्थितीत, कोणतीही व्यक्ती किमान 67 रुपये किंवा 670 रुपये, 6700 रुपये, 67000 रुपये किंवा 6.7 लाख रुपयांपर्यंत योगदान देऊ शकते. ते म्हणाले की, शनिवारी ‘डोनेट फॉर न्याय कॅम्पेन’ सुरू केल्यानंतर काही तासांतच 2 कोटी रुपये जमा झाले. 670 रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्यांना राहुल यांच्या स्वाक्षरीचा टी-शर्ट मिळेल.
माकन यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी काँग्रेसने चालवलेल्या ‘डोनेट फॉर देश’ मोहिमेअंतर्गत एका महिन्यात 17 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती. अशा मोहिमेचा उद्देश केवळ देणगी गोळा करणे नसून लोकसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्ते आणि समर्थकांना एकत्रित करणे हा आहे, असे ते म्हणाले.
माकन म्हणाले की, जो कोणी पक्षाला 670 रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देईल, त्याला राहुल गांधींच्या स्वाक्षरीचा टी-शर्ट दिला जाईल.
काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ 14 जानेवारीला मणिपूरमधून सुरू झाली. ही यात्रा 6,713 किलोमीटरचे अंतर कापून 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून जाणार असून 20 किंवा 21 मार्च रोजी मुंबईत संपेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App