विशेष प्रतिनिधी
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिवारवादाच्या मुद्द्यावर सर्व राजकीय घराण्यांवर तुफानी हल्लाबोल चालवला असतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यापुढे जाऊन महाराष्ट्रात ठाकरे – पवारांच्या घराणेशाहीवर हल्लाबोल केला. शरद पवार 50 वर्षे राजकारणात असल्याचे सांगतात, पण त्यांच्या 50 वर्षांच्या राजकारणाचे महाराष्ट्रावर ओझे पडले आहे. त्यांनी 50 वर्षांचा हिशेब द्यायला पाहिजे, तो तर सोडाच, पण त्यांनी 5 वर्षांच्या राजकारणाचा तरी हिशेब द्यावा, अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी पवारांच्या राजकारणाचे वाभाडे काढले. Pawar’s 50 years of politics burden on Maharashtra
जळगावमधील “सागर पार्क” या मैदानावर भाजप युवा संमेलनाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अमित शाह यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. घराणेशाहीवरून बोलताना शहा यांनी या दोन्ही नेत्यांना आपल्या मुलांना मुख्यमंत्री करायचे असल्याचे म्हणत घणाघाती टीका केली.
अमित शाहांचा पवारांवर निशाणा
मी शरद पवारांना सांगतो. तुमच्या 50 वर्षांच्या राजकारणाचे लोकांवर ओझे पडले आहे. तुम्हाला 50 वर्षांपासून लोक सहन करत आहे. 50 वर्षाचे सोडा, 5 वर्षांचा हिशोब पवारांनी द्यावा, मोदींना तिसऱ्यांदा 400 पार देऊन विजयी करा. आम्ही त्यासाठी पूर्ण काम केलं आहे. काँग्रेसने व्होट बँकच्या लालचेत देशाच्या संस्कृतीला मागे टाकण्याचं काम केलं. या देशात राम मंदिर आधीच व्हायला हवे होते. पण काँग्रेसने व्होट बँकेच्या भीतीने रामलल्लाला 70 वर्ष तंबूत ठेवले. मोदींनी भव्य मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठापना केली. मोदींनी काशीविश्वानाथ कॅरिडोअर, वन रँक वन पेन्शन दिल्याचे शाह यांनी सांगितले.
सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे. उद्धव ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचे आहे. शरद पवार यांना सुप्रियाला मुख्यमंत्री बनवायचे आहे. ममता बॅनर्जींना भाच्याला मुख्यमंत्री करायचे आहे. तुमच्यासाठी कोणीच नाही. पण तुमच्यासाठी मोदी आहे. मोदींनी विकसीत भारताचे लक्ष्य ठेवल्याचं अमित शाहांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात तीन चाकी रिक्षा चालू आहे, तिचे नाव महाविकास आघाडी आहे. या रिक्षाची तिन्ही चाके पंक्चर आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच महाराष्ट्राला विकास देऊ शकत असल्याचे अमित शाह म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App