विरोधकांच्या “इंडियाला” मारून “चाट”; पवारांची मोदींच्या पाठीवर थाप!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : विरोधकांच्या इंडियाला मारून “चाट”; पवारांची मोदींच्या पाठीवर थाप!!, असेच आज लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात घडले. pawar shake hand with modi

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात शरद पवार प्रमुख पाहुणे होते. शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले. पण विरोधकांना टांग मारून पवार त्या कार्यक्रमाला हजर राहिले. इतकेच नाही, तर मोदी व्यासपीठावर त्यांच्यासमोर येताच त्यांच्याशी काही हास्यविनोदाने बोलले. त्यावेळी पवारांनी मोदींशी हस्तांदोलन करून त्यांच्या पाठीवर थाप मारली. पवारांनी मुलींच्या पाठीवर थाप मारण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात मोदींनी पवारांना असे काय सांगितले, की ज्यामुळे पवार मोकळेपणाने हसले आणि हस्तांदोलन करून मोदींच्या पाठीवर थाप मारली, याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली आहे.

– पवारांच्या भाषणातून विरोधकांची निराशा

तसेही पवारांनी आजच्या भाषणात विरोधकांची पूर्ण निराशा करून टाकली. काँग्रेसच्या नेत्यांनी पवार साहेब, तुम्ही मोदींना मणिपूर वरून सुनवा, असा आग्रह धरला होता. रोहित पवारांनी या आग्रहाला दुजोरा दिला होता पवारांनी काँग्रेसचा आणि आपल्या नातवाचा हा आग्रह खुंटीला टांगला आणि मोदींना काहीच सुनावले नाही. उलट मोदींशी हस्तांदोलन करून त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओतून विरोधकांची प्रचंड किरकिरी झाली असून काँग्रेस सह सर्व विरोधकांची प्रचंड निराशा झाली.

त्यामुळे विरोधकांच्या “इंडिया” आघाडीला मारून “चाट”; पवारांची मोदींच्या पाठीवर थाप!! असेच सगळीकडे बोलले जात आहे.

pawar shake hand with modi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात