राष्ट्रवादी + उबाठाच्या काँग्रेस मधल्या विलीनीकरणाच्या मोदींच्या वक्तव्यावर पवारांचे नाशिकमधून पुन्हा शिक्कामोर्तब!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदान संपल्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसही विचारसरणीच्या सगळ्या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हावे, असे सूचक उद्गार काढले होते. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले आणि त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन केवळ नकली राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे भाकीत केले. हेच भाकीत त्यांनी काल दिंडोरी मधल्या सभेत बोलून दाखवले. शरद पवारांनी आज नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदींच्या कालच्या दिंडोरीतल्या भाकितावर शिक्कामोर्तब केले. Pawar again stamped from Nashik on Modi’s statement about the merger of NCP  Ubatha with Congress!!

दिंडोरीत प्रचारसभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “महाराष्ट्रातील अनेक लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची योजना इंडी आघाडीने आखली आहे. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन करून मजबूत विरोधी पक्ष बनवण्याचा त्यांचा इरादा आहे.

शरद पवार यांनी नाशिक मध्ये काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यात पवारांनी मोदींच्या वक्तव्यावर वेगळ्या पद्धतीने शिक्कामोर्तब केले. पवार म्हणाले, मीच असं सुचवलेलं की, काँग्रेसची विचारधारा जोपासणारे, काँग्रेसच्या विचारधारेवर चालणारे अनेक पक्ष आहेत. मी केवळ विचारधारेबद्दल बोलतोय. काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक पक्ष विखुरले आहेत, त्या पक्षांबाबत मी एक सल्ला दिला होता की समान विचारधारा असणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार करायला हवा. तसं करणं खूप उपयुक्त ठरेल. हा माझा विचार होता. मात्र यामुळे मोदींना कसला त्रास झाला ते मला समजलं नाही!!

राज ठाकरेंना टोला

कल्याणमधील सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले होते की शरद पवारांनी याआधी अनेक राजकीय पक्ष फोडले. त्यामुळे आता त्यांचा पक्षदेखील फुटला आहे. राज ठाकरे यांच्या या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिले. शरद पवार म्हणाले, राज ठाकरे नक्की काय म्हणाले ते काही मला माहिती नाही. पढ राज ठाकरे यांचे आज महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके स्थान काय आहे हे देखील मला माहिती नाही. नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे, असे म्हटले जायचे, पण ते आता नाशिकमध्ये दिसत नाहीत.

Pawar again stamped from Nashik on Modi’s statement about the merger of NCP  Ubatha with Congress!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात