संतप्त प्रवाशांनी सोशल मीडियावर व्यक्त केला रोष
विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात सलग सुट्ट्या आल्याने नागरिकांकडून मोठ्याप्रमाणावर कुटुंबासह पर्यटनास जाण्याचे नियोजन केले गेल्याचे दिसून आले. परिणामी बस स्थानकापासून ते विमानतळपर्यंत सर्वच ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी होती. तर दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थाही आहे. अशातच पुणे विमानतळावर मात्र डिजीयात्रा सुविधेत झालेल्या गडबडीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मोठ्याप्रमाणावर प्रवासी विमानतळावरच ताटकळत थांबले. Passengers were stranded at Pune Airport due to technical problems in the Digiyatra facility
डिजीयात्रा सुविधेतील तांत्रिक अडचणीमुळे विमानतळावरील चेकइन प्रक्रियेला अतिशय विलंब लागला, परिणामी आलेल्या नागरिकांना विमानतळावर रांगेत तासंतास उभा रहावे लागले. याशिवाय पुणे विमानतळावर रविवार १३ ऑगस्ट रोजी ९८ विमानांचे उड्डाण आणि ९८ विमानांचे आगमन झाले, ज्यामुळे आतापर्यंत एक दिवसातील सर्वाधिक उड्डाणांची नोंद झाली. एवढ्या मोठ्याप्रमाणावर विमानांची येजा झाली म्हणजे प्रवासी देखील तेवढ्याच प्रमाणात विमानतळावर पोहचेल परिणामी गर्दी देखील झाली.
विमानतळ कर्मचार्यांच्या गलथान कारभारामुळे अनेक प्रवाशांनी विविध प्रकारे आपली नाराजी व्यक्त केली. काहींनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवल्या. अशाचप्रकारे नेहमी प्रवास करणाऱ्या सथियामूर्ती यांनीही मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.
“पुणे विमानतळावर डिजी यात्रा सेवा असण्याचा अर्थच काय? जर ती कार्यान्वितच होत नाही. ही सेवा कार्यान्वित आहे असे गृहीत धरून जर एखादा प्रवासी वेळेत विमानतळावर पोहचत असेल, तर मग फायदा काय? संचालकांच्या कार्यालयात पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे कोणीही नव्हते, तसेच विमानतळावरील हेल्प डेस्कला कोणीही अटेंडेंट नव्हते.” असेही त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App