वृत्तसंस्था
धारवाड : कर्नाटकात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. धारवाडच्या एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. एका पार्टीमुळे तब्बल १८२ विद्यार्थ्यांना कोरोना झाला आहे. Party fell expensive in Karnataka; Corona to 172 medical college students
गुरुवारी हा आकडा केवळ ६६ होता. रुग्णांची संख्या आणखीन वाढण्याची भीती आहे. विशेष म्हणजे बाधितांची कोरोनाविरोधी लसींचे दोन्ही डोस घेतले होते. कॅम्पसमध्ये फेशर्स पार्टी आयोजित केली होती. या पार्टीनंतरच बाधितांची संख्या झपाट्याने वाढली.
या मेडिकल कॉलेजमध्ये एकूण ४०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी ३०० विद्यार्थ्यांच्या चाचण्या झाल्या असून त्यापैकी १८२ जणांनाकोरोना झाला आहे. यानंतर ३ हजार जणांच्या चाचण्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये २९ लाख ९४ हजार ५६१ रुग्ण आढळले आहेत. राज्यात मृत्यूची संख्या ३८ हजार १८७ आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App