विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे पडून तब्बल 351 कोटींच्या नोटा सापडल्या. त्यांच्या घरावर आणि कंपन्यांवर अजूनही छापे सुरूच असून जमिनीखाली त्यांनी सोने – चांदी आणि अन्य संपत्ती दडवून ठेवल्याच्या बातम्या येत असतानाच अचानक संसदेतील घुसखोरीचा विषय सुरू झाला आणि धीरज प्रसाद साहूंच्या दरोडेखोरीचा विषय मागे पडून काँग्रेस हायकमांडची मान त्यातून सध्या तरी सुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.Parliament security breach covers up dhiraj sahu cash scam!!
13 डिसेंबर 2023 रोजी काँग्रेसी आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या युवकांनी घुसखोरी केली. संसदेच्या सुरक्षेचा भंग केला. हा विषय राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर तापला. काँग्रेस पक्षातल्या 5 खासदारांचे आणि विरोधकांमधल्या एकूण 14 खासदारांचे निलंबन होईपर्यंत विषय येऊन ठेपला. संसदेतील घुसखोरीचे धागेदोरे फुटीरतावादी शेतकरी आंदोलनापर्यंत पोहोचले. इतकेच काय तर संस्थेतील घुसखोरांचे मास्टरमाईंड कम्युनिस्ट आणि काँग्रेसी असल्याचे सिद्ध झाले. पण तरी देखील काँग्रेस खासदारांनी गदारोळ करून स्वतःचे निलंबन उडवून घेतले. पण या सगळ्या प्रकारात गेले आठवडाभर वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यमांमध्ये तापलेला विषय पूर्ण मागे पडला. धीरज कुमार साहू या राज्यसभा खासदाराच्या कंपन्यांमध्ये सापडलेली 351 कोटींची रक्कम त्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये सोने-चांदी आणि अन्य मौल्यवान वस्तू लपवल्याचा संशय या सगळ्याच्या तारा कुठे ना कुठेतरी काँग्रेस हायकमांड पर्यंत पोहोचत होत्या.
काँग्रेसने धीरज कुमार साहू प्रकरणातून सुरुवातीला हात झटकले. त्यांच्याकडूनच स्पष्टीकरण मागितले, तरी देखील दिवसेंदिवस या प्रकरणाचे उत्तर देणे काँग्रेसला कठीण जात होते. शिवाय नोटांबरोबरच धीरज कुमार साहू यांच्याकडे सापडलेली काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स याची चौकशी आणि तपास पुढे सुरू झाला आणि हे प्रकरण काँग्रेस हायकमांड पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यातून काँग्रेसची निवडणूक स्ट्रॅटेजी उघड्यावर आली. राहुल गांधींना आपला नियोजित परदेश दौरा स्थगित करावा लागला आणि त्यानंतर 13 डिसेंबर रोजी संसदेतली घुसखोरी घडली.
अर्थात धीरज कुमार साहू प्रकरण प्रसार माध्यमांमधून मागे पडले असले इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्या प्रकरणाची चौकशी आणि तपास यंत्रणांनी थांबवलेला नाही, पण माध्यमांमधून हा विषय पिछाडीवर गेल्याने काँग्रेस हायकमांडला हायसे वाटले. पण त्यामुळे धीरज कुमार साहू प्रकरण आणि संसदेतली घुसखोरी या दोन्ही प्रकरणांमधला संशय अधिकाधिक गडद होत चालला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App