पॅरालिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला Paralympics 2024
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुरुषांच्या रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा ६-० असा सहज पराभव केला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील हे चौथे सुवर्ण आणि एकूण 22 वे पदक आहे. भारतीय खेळाडूने हा सामना २८-२४, २८-२७, २९-२५ अशा सरळ सेटमध्ये जिंकून इतिहास रचला आहे. Paralympics 2024
हरविंदर सिंग आता पॅरालिम्पिकच्या इतिहासात तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही नवा विक्रम केला होता. त्यावेळी, पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पदक (कांस्य) जिंकणारा तो पहिला तिरंदाज ठरला. पॅरिस पॅरालिम्पिकमधील तिरंदाजीमधील भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजीमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
Anti-Rape Bill : पश्चिम बंगाल विधानसभेत अँटी रेप बिल मंजूर; पीडिता कोमात गेली अथवा मृत्यू झाला तर दोषीला 10 दिवसांत फाशी होणार
हरविंदर सिंग पॅरालिम्पिकच्या इतिहासातील तिसरे पदकही जिंकू शकतो. आता तो पूजा जटायनसह रिकर्व्ह तिरंदाजीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत पदकासाठी स्पर्धा करेल. सांघिक स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना ५ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. जर हरविंदरने त्या स्पर्धेतही सुवर्णपदकाचे लक्ष्य केले तर तो एका पॅरालिम्पिक खेळात २ सुवर्णपदके जिंकणारा इतिहासातील पहिला भारतीय खेळाडू बनेल.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने जिंकलेल्या पदकांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे, ज्यामध्ये ४ सुवर्ण, ८ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे. आता भारत पदकतालिकेत १५ व्या स्थानावर आला आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण १९ पदके जिंकली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more