या अगोदरच्या सुनावणीत सरकारने आपली भूमिका केली होती स्पष्ट
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पालघरमध्ये साधूंच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन साधूंच्या कथित लिंचिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. Palghar Lynching Case Supreme Court gives green flag to CBIs investigation in Sadhus murder
पालघर लिंचिंग प्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, राज्य सरकार या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करू शकते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही पालघर लिंचिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की राज्याने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या टप्प्यावर पुढील निर्देशांची आवश्यकता नाही.
मागील सुनावणीत न्यायालयाला सांगण्यात आले होते की, महाराष्ट्र सरकार सीबीआय चौकशीसाठी तयार आहे. आपली भूमिका बदलत सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की दोन साधूंसह तीन लोकांच्या कथित लिंचिंगचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास तयार आहे.
Maharashtra government informs the Supreme Court that it has decided to hand over to CBI the probe into the Palghar lynching case wherein two Sadhus were lynched to death. pic.twitter.com/4CRXFBOwAa — ANI (@ANI) April 28, 2023
Maharashtra government informs the Supreme Court that it has decided to hand over to CBI the probe into the Palghar lynching case wherein two Sadhus were lynched to death. pic.twitter.com/4CRXFBOwAa
— ANI (@ANI) April 28, 2023
काय आहे पालघर लिंचिंग प्रकरण? –
१६ एप्रिल २०२०च्या रात्री उत्तर प्रदेशातील दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला जमावाने बेदम मारहाण केली होती. हे साधू मुंबईतील कांदिवलीहून गुजरातमधील सुरतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जमावाने त्याला पालघरमध्ये अडवले होते. कथितरित्या ते बाल चोर आहेत, असे समजून जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेवेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस साधूंना वाचवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. जमावाच्या हल्ल्यानंतर साधूंची हत्या करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App