Pakistans : पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; सलग सातव्या दिवशी युद्धबंदीचे केले उल्लंघन

Pakistans

विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर : Pakistans  पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत, ३० एप्रिलच्या मध्यरात्री, पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर (एलओसी) युद्धबंदीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या प्रदेशात नियंत्रण रेषेवर अकारण गोळीबार केला.Pakistans

काश्मीरमधील उरी, अखनूर आणि कुपवाडा सेक्टरमध्ये हा गोळीबार झाला. या क्षेत्रांमध्ये अनेकदा तणावपूर्ण परिस्थिती असते. पाकिस्तानी सैन्याने सलग सातव्या दिवशी नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे.पाकिस्तानच्या या कुरापतीला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले.



२९ एप्रिल आणि ३० एप्रिल रोजी पाकिस्तानी सैन्याने सुंदरबनी, अखनूर आणि नौशेरा सेक्टरमध्येही गोळीबार केला होता. या रात्री झालेल्या हल्ल्याबाबत, भारतीय सैन्याने म्हटले होते की जम्मू आणि काश्मीरमधील सुंदरबनी, अखनूर आणि नौशेरा सेक्टरच्या समोर नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांकडून विनाकारण गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.

Pakistans mischief continues Ceasefire violation for seventh consecutive day

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात