जेव्हा सिनेगॉगवर हल्ला करण्यात आला या घटनेवेळी ज्यूंच्या मंदिरातील कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह सुरु होतं. लाईव्ह दरम्यान घडलेल्या या प्रकाराने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. Pakistani scientist Afia Siddiqui released, 4 held hostage in US for security; Who is Afia Siddiqui?
वृत्तसंस्था
अमेरिका : अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याने ज्यूंच्या मंदिरावर म्हणजेच सिनेगॉगवर हल्ला केला होता.तसेच चार जणांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले होते.दरम्यान यावेळी दहशतवाद्याकडून टेक्सास तुरुंगात असलेल्या पाकिस्तानच्या शास्त्रज्ञ आफिया सिद्दिकीची सुटका करण्याची मागणी केली जात होती.
दरम्यान या घटनेनंतर अमेरिकन सुरक्षा दलाने ओलीस ठेवलेल्या चार पैकी एकाची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेची राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दखल घेतली असून ते या संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे.जेव्हा सिनेगॉगवर हल्ला करण्यात आला या घटनेवेळी ज्यूंच्या मंदिरातील कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह सुरु होतं. लाईव्ह दरम्यान घडलेल्या या प्रकाराने अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
आफिया सिद्दीकी ही एक पाकिस्तानी एक शास्त्रज्ञ आहे. तसेच आफियाला लेडी अल कायदा म्हणून देखील ओळखले जाते. आफियाला 2010 मध्ये अमेरिकन सैनिकांना मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.दरम्यान याप्रकरणी न्यूयॉर्क सिटी फेडरल कोर्टाने आफियाला दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याप्रकरणी दोषी ठरवले.
दरम्यान ती सध्या टेक्सासमधील फोर्ट वर्थ कार्सवेल येथील फेडरल मेडिकल सेंटरमध्ये 86 वर्षांची शिक्षा भोगत आहे.दहशतवाद्याकडून सतत अमेरिकन पोलिसांच्या कैदेत असणाऱ्या याच आफिया सिद्दीकीच्या सुटकेची मागणी केली जात होती.पाकिस्तानमध्ये दोन वेळेस ओलीस नाट्य झालं, त्यावेळेसही आफिया सिद्दीकीला सोडवण्याची मागणी ओलीस ठेवणाऱ्यांनी केली होती.
आफियाला सोडवण्यासाठी फक्त अल कायदाच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानसह इतर अनेक नेत्यांनी प्रयत्न केलाय. डॉ.आफिया ही सामाजिक कार्यकर्त्या देखील आहे. तसेच तिच्यावर केनियातील यूएस दूतावासावर हल्ला केल्याचाही आरोप आहे.वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर एफबीआयने मे 2002 मध्ये आफिया आणि तिचा पती अमजद खान याची सखोल चौकशी केली होती.
आफिया सिद्दीकीने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून न्यूरोसायन्समध्ये पीएचडी केली आहे.दरम्यान 2003 मध्ये जेव्हा दहशतवादी खालिद शेख मोहम्मदने एफबीआयला त्याच्याबद्दलचे संकेत दिले तेव्हाच त्याचे नाव दहशतवादी कारवायांमध्ये आले होते. यानंतर डॉ. आफियाला अफगाणिस्तानमधून अटक करण्यात आली. अफगाणिस्तानमध्ये तिने बगराम तुरुंगात एफबीआय अधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तिला अमेरिकेत पाठवण्यात आले.
#UPDATE The man who held four people hostage at a Texas synagogue is identified by US authorities as a British citizen, while UK police later arrested two teens over an attack that President Joe Biden calls an "act of terror" https://t.co/G3QOWlSuKX pic.twitter.com/Y2Oxypatbh — AFP News Agency (@AFP) January 17, 2022
#UPDATE The man who held four people hostage at a Texas synagogue is identified by US authorities as a British citizen, while UK police later arrested two teens over an attack that President Joe Biden calls an "act of terror" https://t.co/G3QOWlSuKX pic.twitter.com/Y2Oxypatbh
— AFP News Agency (@AFP) January 17, 2022
आफियाला 2011 मधील मेमोगेट घोटाळ्याची मुख्य सूत्रधार म्हणूनही तिला ओळखले जाते.तसेच तिच्यावर अफगाणिस्तानमधील अमेरिकन गुप्तचर एजंट व अमेरिकेत राहणारे पाकिस्तानचे राजदूत हुसैन हक्कानी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. दरम्यान एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात एक करार झाला आहे ज्यात डॉ. शकील अहमदच्या बदल्यात आफिया सिद्दीकीला परत केले जाईल. डॉ. शकील अहमदने अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी अमेरिकन गुप्तचर संस्थांना मदत केली होती. यामुळे 2018 मध्ये सिद्दीकी प्रसिद्धी झोतात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App