पाकिस्तानी पत्रकारांना विश्वचषकासाठी मिळाला व्हिसा, भारत-पाकिस्तान सामन्यासाठी येणार

आतापर्यंत केवळ पाकिस्तान संघातील खेळाडूंनाच विश्वचषकासाठी भारताचा व्हिसा मिळाला होता

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वचषकादरम्यान पाकिस्तान संघासाठी एक दिलासायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादमध्ये होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कव्हर करण्यासाठी अनेक पाकिस्तानी पत्रकारांना भारताचा व्हिसा मिळाला आहे.  आतापर्यंत केवळ पाकिस्तान संघातील खेळाडूंनाच विश्वचषकासाठी भारताचा व्हिसा मिळाला होता. मात्र आता पत्रकारांनाही व्हिसा मिळाला आहे. Pakistani journalists got visas for World Cup will come for India Pakistan match

RevSportz च्या अहवालानुसार, पाकिस्तानमधील 60 हून अधिक पत्रकारांना भारताचा व्हिसा मिळाला आहे. अहमदाबाद येथे होणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे सर्व पत्रकार कव्हरेज करतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या शानदार सामन्याबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळले. दोन्ही सामन्यात पाकिस्तानने विजयाची नोंद केली आहे. पहिला सामना नेदरलँड आणि दुसरा श्रीलंकेविरुद्ध खेळला गेला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने वनडे विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता.

Pakistani journalists got visas for World Cup will come for India Pakistan match

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात